शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
2
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
3
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
4
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
5
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
6
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
7
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
8
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
9
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
10
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
11
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
12
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
13
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
14
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
15
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
16
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
17
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
18
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
19
मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ‘हिट’, शेतकरी, धारावी पुनर्वसन आंदोलन याच मार्गाने जाणार?
20
“आज BJP आहे, उद्या बाजी पलटेल, काँग्रेस सत्तेत येईल”; कोणत्या नेत्यांनी व्यक्त केला विश्वास?

मकरसंक्रांत उत्साहात साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2020 00:35 IST

वाढती महागाईतून मार्ग काढीत नागरिकांनी मकरसंक्रांतीचा सण गोड केला. यानिमित्ताने शहर परिसरातील सामाजिक संस्थांनी विविध उपक्रम साजरे करून तिळगूळ वाटून सण साजरा केला.

ठळक मुद्देमालेगाव : पतंग उडवत तिळगुळाचे वाटप

संगमेश्वर : वाढती महागाईतून मार्ग काढीत नागरिकांनी मकरसंक्रांतीचा सण गोड केला. यानिमित्ताने शहर परिसरातील सामाजिक संस्थांनी विविध उपक्रम साजरे करून तिळगूळ वाटून सण साजरा केला.नूतन वर्षात पहिला येणारा मकरसंक्रांतीचा सण कौटुंबिक वातावरणात पुरणपोळी, तिळगूळ पोळी तयार करून साजरा करणयात आला. सर्वच जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढल्याने सर्वसाधारण नागरिक त्रस्त झाला आहे. वाढत्या महागाईतून मार्ग काढीत घरी बनविलेले तिळाचे लाडू वा विकत आणून एकमेकांना देत मनातील कटुता विसरून गोड गोड बोलण्याच्या एकमेकांना शुभेच्छा दिल्या. शहर परिसरात खापराच्या पोळी विक्री केंद्राची अनेक केंद्रे उभारण्यात आली होती. नागरिकांनी येथून पुरणपोळी खरेदी करण्यासाठी गर्दी झाली होती. याशिवाय शहरातील सर्वच मुख्य रस्त्यावर वा गल्लीबोळात तिळगूळ, हलवा, लाडू विक्रीचे विशेष स्टॉल उभारण्यात आले होते. या ठिकाणी आबालवृद्धांची खरेदीसाठी गर्दी झाली होती. बुधवारी सकाळपासूनच तरुणाईला पतंग उडविण्याचे वेध लागले होते. घराच्या टेरेस, धाबे, गच्चीवर सर्वच वयोगटातील नागरिक पतंग उडविण्याचा आनंद घेत होते. शहराच्या पश्चिम भागातील उंच इमारतीतील कुटुंबांनी पतंग उडवून पतंग काटा-काटीची मजा घेतली. विविध आकर्षक पतंगांनी आकाश व्यापले होते. सायंकाळी अंधार पडेपर्यंत नागरिक पतंग उडविण्यात दंग होते. सायंकाळी ठिकठिकाणी तिळगूळ वाटपाचा कार्यक्रम झाला. महिला मंडळासह स्वयंसेवी संस्थांनी यासाठी पुढाकार घेतला. महिलांनी ठिकठिकाणी हळदी-कूंकूचे आयोजन करून महिलांना वाण म्हणून भेटवस्तूंचे वाटप करीत संक्रांत सणाचा आनंद द्विगुणित केला. कॅम्पातील साने गुरुजी रुग्णालयाच्या वतीने वासंतिक वुमेन शिबिराला आजपासून प्रारंभ झाला. येत्या १५ एप्रिलपर्यंत हे शिबिर विनामूल्य असणार आहे, असे रुग्णालयाचे प्रबंधक जयेश शेलार यांनी सांगितले. याशिवाय महाप्रसाद वाटप, स्नेहमेळावा आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर अनेकांनी इलेक्ट्रिक उत्पादने, दुचाकी, -चारचाकी वाहने, सुवर्णालंकार व इतर वस्तूंची खरेदी केली. समाजमाध्यमाद्वारे एकमेकांना शुभेच्छा देण्यात नागरिक व्यस्त होते. आकर्षक संदेशाची देवाण-घेवाण करण्यात आली. अनेक गंमतीदार संदेशाचा आनंद नागरिकांनी घेतला.बालाजी सेवा संस्थेच्या वतीने कार्यक्रमबालाजी सेवा संस्थेच्या वतीने संगमेश्वरातील महादेव मंदिराच्या पटांगणात रक्तदान शिबिर घेण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते डॉ. वर्धमान लोढा, आदिनाथ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रदीप कापडिया, कॅम्प वाचनालयाचे सचिव रमेश उचित प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. रक्तदात्यांना प्रशस्तीपत्र व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. सूत्रसंचालन आबा बागुल यांनी केले. आभार मनोज वारूळे यांनी मानले. बालाजी सेवा संस्थेचे अध्यक्ष सूर्यकांत मोहिते, चेतन लोखंडे, दीपक गुप्ता, प्रकाश सुराणा, डॉ. हिरे आदी उपस्थित होते.

टॅग्स :kiteपतंग