शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवारांनी साधला रविवारचा मुहूर्त

By admin | Updated: March 27, 2017 00:43 IST

नाशिक : सार्वजनिक वाचनालयाच्या निवडणुकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना उमेदवारांमध्ये निवडणुकीच्या प्रचारासाठी लगबग दिसून येत आहे.

नाशिक : सार्वजनिक वाचनालयाच्या निवडणुकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना उमेदवारांमध्ये निवडणुकीच्या प्रचारासाठी लगबग दिसून येत आहे. रविवारी सुटीचा दिवस असल्याने विविध पॅनलमधील उमेदवारांनी मतदारांच्या वैयक्तिक भेटीगाठींवर तसेच सावानाच्या आवारात वाचनालयात पुस्तक बदलण्यासाठी येणाऱ्या सभासदांना हात जोडून विनवणी करण्यात येत होती.रविवारी सुटीचा दिवस असल्याने वाचनालयात येणाऱ्या सभासदांची संख्यादेखील जास्त होती तसेच अनेक सभासद सुटीच्या दिवशी घरी असल्याने उमेदवारांनी अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला. सार्वजनिक वाचनालयाच्या आवारातही ग्रंथमित्र पॅनल आणि जनस्थान पॅनलच्या उमेदवारांनी, तर काही अपक्ष उमेदवारांनी दिवसभर तळ ठोकलेला होता. वाचनालयात पुस्तक बदलण्यासाठी येणाऱ्या सभासदांना प्रत्येक उमेदवार गराडा घालून भंडावून सोडत असल्याचे चित्र रविवारी (दि. २६) बघायला मिळाले. वाचनालय परिसरात ज्याप्रमाणे उमेदवार तळ ठोकून उभे होते त्याचप्रमाणे पॅनलमधील अनेक उमेदवार वेगवेगळे गट करून शहरातील विविध भागांत जाऊन मतदारांच्या भेटीगाठी घेत होते. गुढीपाडवा सणाच्या पार्श्वभूमीवर गोदाघाटावर महारांगोळी काढण्यात आली होती, ही रांगोळी बघण्यासाठी येणाऱ्या नाशिककरांची संख्या लक्षात घेऊन जनस्थान पॅनलने रविवारी गोदाघाटावर पुस्तक परिक्रमा या उपक्रमाचे आयोजन करून मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला.  प्रचाराच्या रणधुमाळीत सगळ्याच पॅनलकडून मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सांगत असले तरी खरे चित्र निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. दरम्यान, आज सोमवारी धर्मादाय आयुक्त सुनावणीवर काय निकाल देतात याकडेही साहित्य रसिकांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)