शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

सुट्यांमुळे उमेदवारांची पंचाईत

By admin | Updated: January 29, 2017 00:31 IST

प्रमाणिकरणात अडचण : नामनिर्देशनपत्रास विलंब

नाशिक : महापालिका निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या प्रक्रियेस शुक्रवार (दि.२७) पासून सुरुवात झाली असली आणि सुटीच्याही दिवशी अर्ज स्वीकृती सुरू ठेवण्यात आली असली तरी चौथा शनिवार (दि.२८) आणि रविवार (दि.२९) साप्ताहिक सुटीमुळे शासकीय कामकाज बंद असल्याने शपथपत्रांसह आवश्यक ती कागदपत्रे प्रमाणित करून घेण्यात उमेदवारांना अडचणी आल्या. त्यामुळे शनिवारी केवळ तीनच अर्ज दाखल होऊ शकले, तर रविवारीही अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.  महापालिका निवडणुकीसाठी ३ फेबु्रवारीपर्यंत नामनिर्देशनपत्र दाखल केले जाणार आहेत. शुक्रवार, दि. २७ जानेवारीपासून अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेस प्रारंभ झाला. अर्ज दाखल करण्याच्या कालावधीत चौथा शनिवार आणि रविवार हे दोन शासकीय सुटीचे दिवस आले. मात्र, या दोन्हीही दिवशी उमेदवारी अर्ज स्वीकारण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने महापालिकांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यानुसार, चौथ्या शनिवारी (दि.२८) निवडणूक कार्यालये खुली होती. परंतु, पूर्व विभागातून दोन आणि पंचवटी विभागातून केवळ एकमेव अर्ज दाखल होऊ शकला. राज्य निवडणूक आयोगाने यंदा प्रथमच महापालिका निवडणुकीसाठी संगणकाद्वारे आॅनलाइन अर्ज भरणे बंधनकारक केले आहे. सदर आॅनलाइन अर्ज २४ तासांत कधीही भरता येईल मात्र, संबंधित उमेदवारांना आॅनलाइन भरलेल्या अर्जाची प्रिंट काढून आवश्यक ती कागदपत्रे विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांमार्फत अथवा नोटरीद्वारे प्रमाणित करून ती प्रत निवडणूक अधिकाऱ्याकडे सुपूर्द करावी लागणार आहे. निवडणूक अधिकाऱ्याकडून रीतसर अनामत रक्कम भरल्याची पावती प्राप्त झाल्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल झाल्यावर शिक्कामोर्तब होणार आहे. मात्र, चौथा शनिवार आणि रविवारी साप्ताहिक सुटी यामुळे शासकीय कामकाज बंद असल्याने अधिकारी वर्गही सुटीवर आहे. त्यामुळे, आवश्यक त्या कागदपत्रांचे प्रमाणिकरण करून घेण्यात उमेदवारांना अडचणी उद्भवत आहेत. परिणामी, नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास विलंब लागत आहे.