शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बॅँकेच्या २३ शाखांच्या विलीनीकरणाचा निर्णय रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 01:41 IST

नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेने खर्चात कपात करण्यासाठी बॅँकेच्या ग्रामीण २३ शाखांचे विलीनीकरण करण्याचा निर्णय घेतला होता; मात्र त्यावर तीव्र पडसाद उमटू लागताच बॅँकेने शाखांचे विलीनीकरणाचा घेतलेला निर्णय मागे घेतला आहे. आता या शाखांचे मजबुतीकरण केले जाणार असल्याची माहिती जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष केदा आहेर यांनी बुधवारी (दि. १३) दिली.  ...

नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेने खर्चात कपात करण्यासाठी बॅँकेच्या ग्रामीण २३ शाखांचे विलीनीकरण करण्याचा निर्णय घेतला होता; मात्र त्यावर तीव्र पडसाद उमटू लागताच बॅँकेने शाखांचे विलीनीकरणाचा घेतलेला निर्णय मागे घेतला आहे. आता या शाखांचे मजबुतीकरण केले जाणार असल्याची माहिती जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष केदा आहेर यांनी बुधवारी (दि. १३) दिली.  नोटाबंदी व कर्जवसुली न झाल्याने जिल्हा बॅँक आर्थिकदृष्ट्या अडचणीत आली आहे. बॅँकेची ही स्थिती लक्षात घेऊन बॅँकेचा प्रशासकीय खर्च याचा ताळमेळ घेण्यास सुरु वात केली.   अल्प व्यवहार होत असलेल्या तोट्यातील २३ शाखा बंद करण्यात आल्या आहेत. सदरच्या शाखा प्रशासकीय खर्च, कर्मचाऱ्यांचे वेतन, भत्ते, कार्यालयीन खर्च यामुळे या शाखा तोट्यात गेल्याने त्या संचालक मंडळाकडे सदरच्या बॅँक शाखांचे विलीनीकरण करण्याचा प्रस्ताव सादर केला होता. संचालक मंडळाने २३ एप्रिल रोजी झालेल्या बैठकीत मंजुरी दिली होती. या झालेल्या निर्णयानुसार येत्या दि. ३० जूनपर्यंत सदरच्या शाखांचे विलीनीकरण नजीकच्या बॅँक शाखांमध्ये केले जाणार होते.  मात्र त्यामुळे शेतकरी सभासदांची गैरसोय होणार असल्याने शाखांचे विलीनीकरण करू नये अशी मागणी शेतकºयांकडून होत होती. त्यामुळे ग्राहकांची गैरसोय, शेतकरी सभासद व विकास कार्यकारी सहकारी संस्थांच्या अडचणी लक्षात घेऊन हा निर्णय संचालक मंडळाने मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे, असे अध्यक्ष केदा आहेर यांनी सांगितले. 

टॅग्स :bankबँक