शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमधून पुण्याकडे जाणाºया बसेस रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 00:43 IST

नाशिक : भीमा कोरेगाव येथील घटनेचे पडसाद शहरासह राज्यभर उमटल्याने पुणे येथील तणाव लक्षात घेता राज्य परिवहन महामंडळाने नाशिकहून पुण्याकडे जाणाºया सर्व शिवशाही बसेस रद्द केल्या आहेत. त्याचप्रमाणे शहरात चार ठिकाणी बसेसवर दगडफेक झाल्याने शहरातील प्रवासी बसेसही काहीकाळ बंद ठेवण्यात आल्या होत्या. नाशिकरोड, सारडा सर्कल आणि वडाळा नाका या ठिकाणी बसेसवर दगडफेक करण्यात आल्याने काहीकाळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.

ठळक मुद्देएस.टी. महामंडळ : चार बसेसचे नुकसान सर्व शिवशाही बसेस रद्द केल्या नाशिकरोड, सारडा सर्कल आणि वडाळा नाका या ठिकाणी बसेसवर दगडफेक

नाशिक : भीमा कोरेगाव येथील घटनेचे पडसाद शहरासह राज्यभर उमटल्याने पुणे येथील तणाव लक्षात घेता राज्य परिवहन महामंडळाने नाशिकहून पुण्याकडे जाणाºया सर्व शिवशाही बसेस रद्द केल्या आहेत. त्याचप्रमाणे शहरात चार ठिकाणी बसेसवर दगडफेक झाल्याने शहरातील प्रवासी बसेसही काहीकाळ बंद ठेवण्यात आल्या होत्या. नाशिकरोड, सारडा सर्कल आणि वडाळा नाका या ठिकाणी बसेसवर दगडफेक करण्यात आल्याने काहीकाळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.पुणे येथील भीमा-कोरेगाव येथे झालेल्या तणावानंतर बसेसवर दगडफेक करण्यात आली होती. त्यामुळे पुणे येथून निघणाºया बसेस थांबविण्यात आल्या तर नाशिकहून निघणाºया बसेसही बंद करण्यात आल्या होत्या. जेलरोड येथे दोन तर नाशिकरोड, वडाळा नाका,कॅनडा कॉर्नर परिसरात बसेसवर दगडफेक करण्यात आली. यामध्ये बसेसच्या काचा फुटून नुकसान झाले. पुण्यात तणाव निर्माण झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने मुंबई, औरंगाबाद, धुळे आणि नाशिकमध्येही घटनेचे लोण पसल्याने अनेक ठिकाणी बसेसवर दगडफेक करण्यात आली. त्यामुळे या शहरांमध्ये जाणाºया सर्व प्रकारच्या बसेस बंद करण्यात आल्या होत्या. तर अनेक बसेस या आहे त्या ठिकाणी थांबविण्यात येऊन खबरदारी घेण्यात आली.नाशिकच्या ठक्कर बसस्थानक येथून निघणाºया शिवशाही बसेस पूर्णपणे थांबविण्यात आलेल्या असून धुळे, औरंगाबाद येथील बसेसही दुपारनंतर बंद करण्यात आल्या होत्या. महामार्ग येथून मुंबईकडे जाणाºया शिवशाही तसेच इतर बसेसही पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्यात आल्या आहेत. भुसावळ-अर्नाळा या बसवर वडाळा नाका येथे दगडफेक करण्यात आली. त्यामुळे महामंडळाने शहरातील तसेच लांबपल्ल्याच्या बसफेºयांमध्ये कपात करून परिस्थितीनुसार बसेस सोडण्याचे नियोजन करण्यात आले होते.नाशिकमधील तणावाची परिस्थिती पाहता शहरातून तुरळक बसेस सुरू होत्या. नांदूरमार्गे जाणाºया बसेस बंद करण्यातआल्या होत्या. तर कॅम्पला जाणाºया बसेसदेखील बंद करण्यात आल्या होत्या. नाशिकरोडलाही तुरळक बसेस सुरू होत्या. सायंकाळनंतर वाहतूक पूर्वपदावर आली. अद्याप नुकसानीचा अंदाज नाहीशहरासह ग्रामीण भागातील काही बसेसवर तसेच लांबपल्ल्याच्या बसेसवरही दगडफेक करण्यात आल्यामुळे नुकसानीचा अद्याप अंदाज आलेला नाही. परंतु शहरातील काही बसेसच्या काचा फोडण्यात आल्या आहेत. काही खासगी बसेसचेदेखील नुकसान करण्यात आले आहे. खबरदारीचा पर्याय म्हणून काही बसेस बंद करण्यात आल्या होत्या. मुंबई, पुणे कडील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली होती.