गेल्या वर्षीच देवळालीतील विविध भागात केंद्राच्या स्वच्छ भारत योजनेअंतर्गत देवळाली छावणी परिषदेच्या हद्दीत भूमिगत गटारीचे काम पूर्ण करण्यात आले. मात्र, या गटारांमधून पाणी वाहून नेण्यासाठी असलेल्या वाहिन्यांचे पाईप हे केवळ सहा इंच इतक्या व्यासाचे टाकण्यात आले आहेत. परिणामी वर्षभरात या वाहिन्या जागोजागी तुंबत आहेत. या वाहिन्यांपैकी येथील सहा नंबर नाका परिसरात असलेल्या मुख्य रस्त्यावर गेल्या काही दिवसांपासून भूमिगत गटारीतून पाणी बाहेर वाहत आहे. या दूषित पाण्यातून निर्माण होणारी दुर्गंधी स्थानिकांना डोकेदुखी ठरली आहे. याबाबत स्थानिक नागरिकांनी ही बाब छावणी परिषदेच्या आरोग्य विभागासह लोकप्रतिनिधींच्या नजरेस आणून देऊन देखील कुठलीही कार्यवाही होत नसल्याने नागरिकांमधून प्रशासनाच्या या वेळकाढू धोरणाविषयी नाराजी व्यक्त केली जात आहे.
कॅम्पला भूमिगत गटारीचे पाणी रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:40 IST