शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिलसाठी प्रचारास वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 19:19 IST

महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलच्या २५ सदस्य निवडीसाठी येत्या २८ मार्चला मतदान होणार आहे़ या निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या १६४ उमेदवारांमध्ये नाशिक जिल्ह्यातील आठ वकिलांचा समावेश असून, सर्वांचा जोरदार प्रचार सुरू आहे़ महाराष्ट्र व गोवा या दोन राज्यांतील एक लाख १२ हजार वकील या निवडणुकीत मतदान करणार असून, मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी अवघ्या १४ दिवसांचा कालावधी उरल्याने वकिलांच्या प्रत्यक्ष गाठीभेटीबरोबरच सोशल मीडियाचा प्रचारासाठी मोठ्या प्रमाणावर वापर सुरू केला आहे़

नाशिक : महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलच्या २५ सदस्य निवडीसाठी येत्या २८ मार्चला मतदान होणार आहे़ या निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या १६४ उमेदवारांमध्ये नाशिक जिल्ह्यातील आठ वकिलांचा समावेश असून, सर्वांचा जोरदार प्रचार सुरू आहे़ महाराष्ट्र व गोवा या दोन राज्यांतील एक लाख १२ हजार वकील या निवडणुकीत मतदान करणार असून, मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी अवघ्या १४ दिवसांचा कालावधी उरल्याने वकिलांच्या प्रत्यक्ष गाठीभेटीबरोबरच सोशल मीडियाचा प्रचारासाठी मोठ्या प्रमाणावर वापर सुरू केला आहे़ महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिल सदस्यपदासाठीच्या इच्छुकांनी सुमारे वर्षभरापासूनच या प्रचारास सुरुवात केली होती़ महाराष्ट्र तसेच गोवा येथे वकिलांच्या होणाऱ्या विविध परिषद, कार्यक्रम यासाठी इच्छुक आवर्जून हजेरी लावीत होते़ या निवडणुकीसाठी अर्ज भरलेल्या उमेदवारांची २८ फेब्रुवारी रोजी अंतिम यादी प्रसिद्ध होऊन उमेदवारांना मतपत्रिकेतील अनुक्रमांकाचे वाटप करण्यात आल्यानंतर प्रचारास खºया अर्थाने सुरुवात झाली़ मात्र, अनुक्रमांक मिळाल्यानंतर मतदानासाठी अवघे काही दिवस उरले असल्याने उमेदवारांनी जिल्हा बार असोसिएशनचे पदाधिकारी तसेच सदस्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या असून, सोशल मीडियावरील व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक यांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो आहे़  महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिल सदस्यपदाच्या या निवडणुकीत कौन्सिलचे माजी अध्यक्ष तथा राष्ट्रीय मसुदा समितीचे निमंत्रक अ‍ॅड़ जयंत जायभावे, माजी सदस्य अ‍ॅड़ अविनाश भिडे, नाशिक बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अ‍ॅड़ दिलीप वनारसे, आॅल इंडिया वुमेन लॉयर्स संघटनेच्या माजी अध्यक्ष अ‍ॅड. इंद्रायणी पटणी, नाशिक बार असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष अ‍ॅड़ बाळासाहेब आडके, अ‍ॅड़ विवेकानंद जगदाळे, अ‍ॅड़ लीलाधर जाधव, अ‍ॅड़ अनिल शालिग्राम हे आठ जण निवडणुकीच्या रिंगणात आहेत़ महाराष्ट्र व  गोवा या दोन्ही राज्यांतील ३११  जिल्हा व तालुका न्यायालयांमध्ये २८ मार्चला निवडणुकीसाठी मतदान होणार आहे़महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलसाठी २०१० मध्ये निवडणूक झाली होती़ सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर तब्बल आठ वर्षांनी ही निवडणूक घेतली जात असून, महाराष्ट्र व गोवा या दोन राज्यांतील एक लाख १२ हजार वकील यासाठी मतदान करणार आहेत़ नाशिक जिल्ह्यातील वकील मतदारांची संख्या चार हजार ५०० आहे़ या निवडणुकीत प्रत्येक वकील मतदारास कमीत कमी पाच, तर जास्तीत जास्त २५ मते देण्याचा अधिकार असून, या निवडणुकीद्वारे कौन्सिलचे २५ सदस्य निवडले जाणार आहेत़ या निवडून आलेल्या सदस्यांमधून अध्यक्ष, उपाध्यक्ष व पदाधिकाºयांची निवड केली जाते़

टॅग्स :advocateवकिलElectionनिवडणूक