शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

नामकोतील प्रशासकीय राजवट हटविण्यासाठी मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 00:05 IST

चार वर्षांपूर्वी आर्थिक अनियमिततेचा ठपका ठेवून नामको बॅँकेवर प्रशासक नियुक्त करण्यात आले होते. मात्र त्यानंतर अद्यापही प्रशासकीय राजवटच असून, त्याविरुद्ध बरखास्त झालेल्या माजी संचालकांनी दंड थोपटले असून, लवकरच प्रशासक हटाव मोहीम राबविली जाण्याची शक्यता आहे.

नाशिक : चार वर्षांपूर्वी आर्थिक अनियमिततेचा ठपका ठेवून नामको बॅँकेवर प्रशासक नियुक्त करण्यात आले होते. मात्र त्यानंतर अद्यापही प्रशासकीय राजवटच असून, त्याविरुद्ध बरखास्त झालेल्या माजी संचालकांनी दंड थोपटले असून, लवकरच प्रशासक हटाव मोहीम राबविली जाण्याची शक्यता आहे.नाशिक मर्चंट को आॅप. बॅँक ही जिल्ह्यातील सर्वात मोठी स्थानिक नागरी सहकारी बॅँक असून, मल्टीस्टेट शेड्युल्ड बॅँक आहे. बहुराज्यीय कार्यक्षेत्र असलेल्या नाशिक मर्चंट बॅँकेत गेल्या अनेक वर्षांपासून (कै.) हुकूमचंद चुनीलाल बागमार यांच्या नेतृत्वाखालील प्रगती पॅनलची सत्ता होती. चार वर्षांपूर्वी बागमार यांच्या काळातील एका आर्थिक व्यवहाराचे निमित्त करून बॅँकेवर भोरीया यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली. आणि संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले. त्यानंतर तत्कालीन संचालक मंडळाने प्रशासक नियुक्तीची कार्यवाही मागे घेण्यासाठी उच्च न्यायालयात दाद मागितली, मात्र रिझर्व्ह बॅँकेच्या बाजूने निकाल लागला. राजकीय प्रयत्नही थिटे पडले. आता चार वर्षे पूर्ण झाल्यानंतर बॅँक पुन्हा सभासद नियुक्त संचालकांच्या हाती सोपवली जावी यासाठी माजी संचालक आणि काही ज्येष्ठ सभासद एकवटले आहेत. एका माजी अध्यक्षाच्या पुढाकाराने माजी संचालकांची बैठकही घेण्यात आली. यावेळी प्रशासक हटाव भूमिका घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे वृत्त आहे. प्रशासकीय काळातील कर्जवाटप, एनपीए अशा अनेक बाबींविषयी माजी संचालकाच्या तक्रारी असल्याचे वृत्त आहे. येत्या गुरुवारी होणारी बॅँकेची वार्षिक सभा गाजण्याची शक्यता आहे.