शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

विभागीय आयुक्तांकडून इन कॅमेरा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 00:17 IST

राज्य नगरविकास विभागाचे उपसचिव शंकर जाधव यांच्या पाठोपाठ मंगळवारी विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी येथील सामान्य रुग्णालयासह मनपाचे वाडिया, अलीअकबर, कॅम्प रुग्णालयांची इनकॅमेरा पाहणी करून रुग्णसेवेचा आढावा घेतला.

मालेगाव : राज्य नगरविकास विभागाचे उपसचिव शंकर जाधव यांच्या पाठोपाठ मंगळवारी विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी येथील सामान्य रुग्णालयासह मनपाचे वाडिया, अलीअकबर, कॅम्प रुग्णालयांची इनकॅमेरा पाहणी करून रुग्णसेवेचा आढावा घेतला. या पाहणी दौऱ्यानंतर शहराला अजून नवीन २०० खाटांच्या रुग्णालयाची गरज असल्याची बाब उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून देऊ. तसेच १६३ रिक्त पदे तातडीने भरण्याची गरज असल्याचे प्रतिपादन माने यांनी शासकीय विश्रामगृहावर घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले.  येथील सामान्य रुग्णालय व महापालिकेच्या रुग्णालयांतील वैद्यकीय अधिकाºयांची रिक्त पदे तातडीने भरण्याचे व नागरिकांना आरोग्य सुविधा पुरविण्याचे आदेश उच्च न्यायालयाने सामाजिक कार्यकर्ते राकेश भामरे यांनी दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान दिले होते. मात्र उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही येथील यंत्रणेकडून रिक्त पदे व सोयीसुविधा पुरविल्या गेल्या नसल्याने याचिकाकर्त्याने उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केल्यानंतर राज्यस्तरीय यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. या याचिकेवर येत्या २ मे रोजी सुनावणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी राज्याच्या नगरविकास विभागाचे उपसचिव शंकर जाधव, कक्षाधिकारी सुनील दोडे यांनी महापालिकेच्या रुग्णालयांतील आरोग्य सेवेची पाहणी करून आढावा घेतला, तर मंगळवारी विभागीय आयुक्त माने मालेगाव दौºयावर आले होते. माने यांनी प्रारंभी सामान्य रुग्णालयातील बाह्य रुग्ण तपासणी विभागातील विविध कक्षांची पाहणी केली. तसेच दुसºया मजल्यावरील विविध कक्षांना भेट देत रुग्णांची विचारपूस केली. तसेच रुग्णालयातील यंत्रसामग्रीची पाहणी केली. या पाहणीनंतर शासकीय विश्रामगृहावर झालेल्या पत्रकार परिषदेत माने म्हणाले की, उच्च न्यायालयात येत्या २ मे रोजी सुनावणी आहे. आरोग्य व नगरविकास विभागाचे सचिव प्रतिज्ञापत्र सादर करणार आहेत. या पार्श्वभूमीवर इनकॅमेरा पाहणी करण्यात आली. या पाहणीदरम्यान रुग्णालय प्रशासनावर कामाचा अतिरिक्त ताण आहे. रुग्णांची संख्या अधिक दिसून येते. १६३ रिक्त पदे भरणे गरजेचे आहे. औषधसाठा पुरेसा दिसून आला. रुग्णालय परिसरातील अतिक्रमणे काढणे गरजेचे आहे. रुग्णांच्या नातेवाइकांना निवाºयाची सोय करणे गरजेचे आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गठित करण्यात आलेल्या समितीने दुसयांदा पाहणी केली.  या समितीत खासदार डॉ. सुभाष भामरे यांचे प्रतिनिधी म्हणून नितीन पोफळे, महापौर रशीद शेख, मनपा आयुक्त संगीता धायगुडे यांचा समावेश होता.  यावेळी अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत, प्रादेशिक उपसंचालक विजय कुलकर्णी, प्रांत अधिकारी अजय मोरे, शहर अभियंता कैलास बच्छाव, उपआयुक्त अंबादास गरकळ, याचिकाकर्ते राकेश भामरे, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक ए. ए. मोमीन आदी उपस्थित होते.अ‍ॅडव्होकेट जनरल यांनी घातले लक्षगेल्या ११ एप्रिल रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने राज्याचे अ‍ॅडव्होकेट जनरल यांना याप्रश्नी लक्ष घालण्यास सांगितले होते. त्यानुसार मंत्रालयात प्रधान सचिवांची बैठक झाली. या बैठकीत प्रधान सचिवांनी स्वत: पाहणी करून अहवाल सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार सोमवारी नगरविकास विभागाचे उपसचिव शंकर जाधव यांनी पाहणी केली, तर मंगळवारी विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी इन कॅमेरा पाहणी केली आहे. तसा अहवाल उच्च न्यायालयात सादर केला जाणार आहे. बुधवारी राज्याचे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव रूग्णालयांची पाहणी करणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून न्यायालयातील सुनावणी व अधिकाºयांचा पाहणी दौराच होत आहे. मूळ त्रुटी दूर करण्यासाठी उपाययोजना केल्या जात नाहीत. केवळ बैठका व निर्णय पार पडत आहेत; मात्र आरोग्यसेवेचा प्रश्न ‘जैसे थे’च आहे. याचिकाकर्त्याचे व सर्वसामान्य नागरिकांचे समाधान होताना दिसत नाही.

टॅग्स :commissionerआयुक्त