शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

कंधाणेत थंडीतापाचे रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 22:14 IST

कंधाणे : परिसरात थंडीतापाचे रुग्ण वाढले असून, यावर उपाययोजना करण्यात प्रशासनाकडून दिरंगाई होत आहे. आरोग्य विभाग व ग्रामपंचायत विभाग स्वच्छता करण्याकडे दुर्लक्ष करत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.

ठळक मुद्देटोलवाटोलवी : आरोग्य विभाग, ग्रामपंचायत प्रशासन उदासीन

कंधाणे : परिसरात थंडीतापाचे रुग्ण वाढले असून, यावर उपाययोजना करण्यात प्रशासनाकडून दिरंगाई होत आहे. आरोग्य विभाग व ग्रामपंचायत विभाग स्वच्छता करण्याकडे दुर्लक्ष करत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.सांडपाणी वाहून नेण्यासाठी सोयीसुविधा नाहीत. यामुळे गावात डासांची उत्पत्ती वाढली आहे. डासांच्या प्रादुर्भावामुळे थंडीताप, खोकला या आजाराच्या रुग्णसंख्येत रोज वाढ होताना दिसत आहे. परिसरातील गावांमध्ये डेंग्यू व स्वाइन फ्लूसदृश आजाराचे रुग्ण आढळून आले आहेत. मात्र आरोग्य विभागाकडून गावात खबरदारीची कोणती उपाययोजना राबविली जात नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. डासांच्या निर्मूलनासाठी स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन व आरोग्य विभाग एकमेकांवर टोलवाटोलवी करत असल्याने कर्मचाऱ्यांच्या सुंदोपसुदीमुळे नागरिकांचे आरोग्य मात्र धोक्यात आले आहे.उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढशासनाकडून गावागावात स्वच्छता अभियान राबविले जात आहे, तर कंधाणेत अस्वच्छतेचे साम्राज्य पसरलेले आहे. काही ठिकाणी सांडपाण्याचे डबके साचले आहेत. अंतर्गत गावातील गटारींची स्वच्छता होणे गरजेचे आहे. नागरिकांनी डासांच्या प्रतिबंधासाठी गावात धूर फवारणी करण्याची मागणी केली असताना संबंधित विभागातील कर्मचारी एकमेकांवर टोलवाटोलवी करत असल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे.रूग्णसंख्या वाढत असून, खासगी दवाखाने व सरकारी दवाखान्यांत उपचारासाठी येणाºया नागरिकांच्या संख्येत वाढ आहे. गावात डासांचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गावात लवकरात लवकर धूर फवारणी करावी.- गंगाधर चव्हाण, कंधाणे.