शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

पळसे परिसरात ऊसशेतीत आढळला बछडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 00:50 IST

पळसे येथील शेतकरी जयंत रमेश साठे यांच्या शेतात ऊसतोड सुरू असताना अवघ्या पंधरा दिवसांच्या बिबट्याचा एक बछडा गुरुवारी (दि. २९) आढळून आला.

ठळक मुद्देवनविभागाने ऊसतोड थांबविली : मादीच्या डरकाळीने मजुरांना फुटला घाम

नाशिकरोड : पळसे येथील शेतकरी जयंत रमेश साठे यांच्या शेतात ऊसतोड सुरू असताना अवघ्या पंधरा दिवसांच्या बिबट्याचा एक बछडा गुरुवारी (दि. २९) आढळून आला. दरम्यान, बछड्याच्या मादीनेही यावेळी ऊसतोड कामगारांना दर्शन दिल्याने त्यांची पाचावर धारण बसली. कामगारांची वर्दळीची कुणकुण लागताच मादीने शेतातून काढता पाय घेतला. मादीच्या डरकाळीमुळे संभाव्य धोका ओळखून घटनास्थळी हजर असलेल्या वन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उर्वरित ऊसतोड तत्काळ थांबविली.मौजे पळसे येथील साठे यांच्या उसाच्या शेतात (गट क्र. ८६५) गुरुवारी सकाळच्या सुमारास ऊसतोड सुरू असताना त्याठिकाणी बिबट्याचा बछडा आढळून आला. यावेळी शेतकरी व मजुरांनी त्यास सुरक्षितरीत्या ताब्यात घेत घटनेची माहिती पोलीसपाटील सुनील गायधनी यांना कळविली. गायधनी यांनी तातडीने याबाबत वनविभागाला माहिती दिली. वनपाल मधुकर गोसावी व वनरक्षक गोविंद पांढरे, राजेंद्र ठाकरे आदींनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत बछड्याला ताब्यात घेतले.यावेळी पुन्हा ऊसतोड मजुरांनी उर्वरित तोडणी सुरू करण्याचा प्रयत्न केला. यावेळी बिबट्याने मजुरांना दर्शन देत डरकाळी फोडल्याने मजुरांंना घाम फुटला.मादी केवळ एकच बछडा सोबत घेऊन जाऊ शकली. एक बछडा मागे सुटल्याने ती आक्रमक होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे वनक्षेत्रपाल विवेक भदाणे यांनी सांगितले. त्यामुळे मौजे पळसे शिवारातील साठे यांच्या शेतातील ऊसतोड सुरक्षेच्या कारणास्तव तूर्तास थांबविण्याची सूचना त्यांना केली आहे. मादी-बछड्यांसह असल्याने वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार पिंजरा लावता येत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Animal Abuseप्राण्यांवरील अत्याचार