हल्ला : विहिरीत पडल्याने दोन जनावरे बचावलीवणीत बिबट्याने केले वासरू फस्तपांडाणे : वणी - सापुतारा रस्त्यालगत धनाई माता मंदिराजवळ बिबट्याने वासरू फस्त केल्याने परिसरातील नागरिक भयभीत झाले, तर गाय व गोऱ्हा विहिरीत पडल्याने बिबट्याच्या हल्ल्यातून बचावले आहेत. जुना पुणेगाव रस्त्यालगतच्या धनाई माता मंदिराजवळ असलेल्या सुधाकर एकनाथ कड यांच्या घराजवळ गाय, वासरू व बैल बांधलेले असताना पहाटे ४-५ वाजेदरम्यान वासरावर ताव मारून सात महिन्यांच्या संकरित गोऱ्हा बिबट्याने फस्त केला. तसेच गाय व गोऱ्ह्याचा पाठलाग केला असता ते जीव घेऊन पळत असताना विहिरीत पडले मात्र विहिरीने तळ गाठला असल्यामुळे गाय व गोऱ्हा वाचले. तद्नंतर सुधाकर कड, विलास कड यांनी जेसीबी मशीनच्या साहाय्याने गाय व गोऱ्ह्याला बाहेर काढले. एस.जी. मोगरे, के. एस. साबळे, फोफशी यांनीत्वरित घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. बिबट्याचा चंडिकापूर परिसरात वावर आहे. त्याला पकडण्यासाठी रवि देशमुख यांच्या शेताजवळ एक पिंजरा दीड महिन्यापूर्वी लावला असल्याचे एस. एल. पगारे यांनी सांगितले. (वार्ताहर)
वणीत बिबट्याने केले वासरू फस्त
By admin | Updated: November 11, 2015 22:48 IST