शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीच्या पूर्वसंध्येपर्यंत आकडेमोड सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 00:47 IST

कर्जदार शेतकºयांना दिवाळीपूर्वी कर्जमाफी देण्याच्या राज्य सरकारच्या घोेषणेची पूर्तता करण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असताना जिल्ह्यातील नेमक्या किती शेतकºयांना त्याचा लाभ मिळणार याच्या आकडेवारीचा शासकीय घोळ पूर्वसंध्येपर्यंत कायम असून, बुधवारी दुपारी जिल्ह्यातील शेतकºयांच्या ३० जोडप्यांना प्रातिनिधिक स्वरूपात कर्जमुक्त झाल्याबद्दल संरक्षण राज्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे.

नाशिक : कर्जदार शेतकºयांना दिवाळीपूर्वी कर्जमाफी देण्याच्या राज्य सरकारच्या घोेषणेची पूर्तता करण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असताना जिल्ह्यातील नेमक्या किती शेतकºयांना त्याचा लाभ मिळणार याच्या आकडेवारीचा शासकीय घोळ पूर्वसंध्येपर्यंत कायम असून, बुधवारी दुपारी जिल्ह्यातील शेतकºयांच्या ३० जोडप्यांना प्रातिनिधिक स्वरूपात कर्जमुक्त झाल्याबद्दल संरक्षण राज्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे.  राज्य सरकारने जुलै महिन्यात जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी स्वाभिमान योजनेंतर्गत शेतकºयांचे दीड लाख रुपयांपर्यंतचे कर्जसरसकट माफ करण्याचे तर दीड लाखापुढील कर्जदार शेतकºयाने कर्जाची परतफेड केल्यास त्याचे दीड लाख रुपयांचे कर्ज माफ होणार आहे.  शासनाने यासाठी शेतकºयांकडून आॅनलाइन अर्ज भरून घेतल्यामुळे त्याला विलंब झाला. दुसरीकडे विरोधी पक्षांनी सरकारची कर्जमाफी फसवी असल्याची टीका सुरू केल्यामुळे शासनाने दिवाळीपूर्वी कर्जमाफी करण्याची घोषणा केली व त्याचा मुख्य समारंभ मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबईत होणार असून, प्रत्येक जिल्ह्णात प्रातिनिधिक स्वरूपात शेतकºयांना कर्जमुक्त झाल्याबद्दल लोकप्रतिनिधींच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे.नाशिक जिल्ह्णातील १,७४,५२५ शेतकºयांनी जिल्हा मध्यवर्ती बॅँकेकडून दीड लाखापर्यंत कर्ज घेतले असल्याने तसेच अन्य राष्टÑीयीकृत बॅँकेचे कर्जदार मिळून एकूण १,८५,००० शेतकºयांनी शासनाच्या कर्जाची माहिती आॅनलाइन अपलोड केलेली असून, या सर्व अर्जांची छाननी केल्यानंतर शासनाच्या निकषात बसणाºया शेतकºयांना कर्जमाफी मिळणार असल्याचे शासनाने यापूर्वी जाहीर केले असले तरी, मंगळवारी सायंकाळपर्यंत शासनाने छाननी केलेली पात्र ठरलेल्या शेतकºयांची यादी जिल्हा बॅँक, सहकार खाते व जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेली नव्हती. शासनाकडून फक्त जिल्हा बॅँकेचे दीड लाख रुपये कर्जदार असलेले फक्त ९० हजार व राष्टÑीयीकृत बॅँकेचे १६ हजार शेतकरीच पात्र असल्याचे सांगण्यात आले. परंतु त्याची यादी मात्र देण्यात आलेली नाही. त्यामुळे जिल्ह्णातील नेमके किती शेतकºयांना शासनाच्या कर्जमाफीचा लाभ होईल, याबाबत संभ्रम कायम आहे.संरक्षण राज्यमंत्री नाशकातशासनाच्या कर्जमाफी योजनेचा लाभ मिळालेल्या जिल्ह्णातील ३० शेतकरी जोडप्यांचा बुधवारी दुपारी एक वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे सत्कार करण्यात येणार आहे. संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रत्येक जिल्ह्णातील दोन याप्रमाणे ३० शेतकरी दाम्पत्यांना साडी-चोळी तसेच कर्जमाफ झाल्याचे प्रमाणपत्राचे वाटप केले जाणार आहे. ज्या शेतकºयांचा सत्कार करण्यात येणार आहे ते कर्जमाफीस पात्र ठरले आहेत.