शहरं
Join us  
Trending Stories
1
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
2
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
3
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
4
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
5
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
6
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
7
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
8
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
9
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
10
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
11
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
12
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
13
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
14
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
15
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
16
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
17
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
18
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
19
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
20
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  

बायपासप्रश्नी वकील संघ आक्र मक

By admin | Updated: October 5, 2015 22:31 IST

सटाणा : तहसीलदारांच्या कक्षात वकिलांचा चार तास ठिय्या

सटाणा : शहरातील बायपासप्रश्नी बांधकाम विभागाने दिलेले आश्वासन दिशाभूल करणारे आणि फसवे असल्याचे स्पष्ट झाल्याने सटाणा वकील संघ अधिक आक्र मक झाला आहे. सोमवारी संतप्त वकील संघाने कोर्टाचे कामकाज बंद ठेवून आपल्या मागणीसाठी येथील तहसीलदारांच्या कक्षात चार तास ठिय्या दिला. मात्र बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता डी. पी. झांबरे यांनी पुन्हा बायपासचा चेंडू भूसंपादन विभागाच्या कोर्टात टाकल्याने काम सुरू होण्याच्या आशा अधिकच धूसर झाल्याचे बोलले जात आहे.दरम्यान, वकील संघ ठिय्या आंदोलनावर ठाम राहिल्याने बांधकाम विभाग, भूसंपादन विभाग, महसूल विभाग यांची वकील संघाच्या उपस्थितीत बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन माजी आमदार संजय चव्हाण यांनी दिल्यानंतर तब्बल चार तासांनी ठिय्या मागे घेण्यात आला.गेल्या काही दिवसांपासून या रस्त्यावर अपघातांची मालिका सुरू झाल्याने शहराबाहेरून जाणाऱ्या बायपासचा प्रश्न ऐरणीवर आला. आणि हा प्रश्न तडीस नेण्यासाठी सटाणा वकील संघाने आंदोलनाचे हत्त्यार उपसले. त्यामुळे लोकप्रतिनिधींसह शासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तहसीलदार अश्विनीकुमार पोतदार यांनी आमदार दीपिका चव्हाण, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता डी. पी. झांबरे, उपअभियंता पी. एम. राजपूत आणि वकील संघाच्या पदाधिकाऱ्यांची 23 आॅगस्टला संयुक्त बैठक घेऊन शहराच्या पश्चिमेकडून मंजूर झालेल्या १२ किलोमीटर लांबीच्या बायपासच्या प्रत्यक्ष कामाला १ आॅक्टोबरपासून सुरुवात करण्यात येईल असे आश्वासन कार्यकारी अभियंता झांबरे यांनी दिले होते. मात्र हे आश्वासन फसवेच ठरल्याने वकील संघ संतप्त होऊन उग्र आंदोलनाचा इशारा दिला होता. काल सोमवारी सकाळी ११ वाजता संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. पंडितराव भदाणे यांच्या नेतृत्वाखाली कोर्टाचे कामकाज बंद ठेवून तहसीलदारांच्या कक्षात ठिय्या देऊन दिशाभूल करणाऱ्या यंत्रणेचा निषेध करण्यात आला. बायपासचे काम तत्काळ सुरू करण्याच्या मागणीवर ठाम असलेल्या वकील संघाच्या ठिय्या आंदोलनाला दोन तास उलटूनही प्रांताधिकारी, तहसीलदार आणि संबंधित यंत्रणेचा एकही अधिकारी न फिरकल्याने संताप व्यक्त करण्यात आला. यावेळी पोलीस निरीक्षक पी. टी. पाटील यांनी आंदोलनकर्ते वकिलांची भेट घेऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मात्र संबंधित आश्वासन देणारे अधिकारी समोर येईपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली. तब्बल चार तासांनी कार्यकारी अभियंता झांबरे आंदोलनाच्या ठिकाणी आले. आंदोलनकर्त्यांसमोर झांबरे यांनी पुन्हा दिलेला शब्द फिरवत प्रक्रि या सुरू करू असा शब्द आपण दिल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे वकील अधिकच संतप्त होऊन दिशाभूल करू नका असे सुनावत संघाचे उपाध्यक्ष अ‍ॅड. नितीन चंद्रात्रे म्हणाले की, रस्ता तत्काळ न झाल्यास सावकीफाटा ते डांग्या मारुतीदरम्यान घडणाऱ्या अपघातांना बांधकाम विभागच जबाबदार राहील व त्यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वकील संघ वेळोवेळी दाखल करेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.तर आंदोलनकर्त्यांनी बायपासचे काम सुरू होईपर्यंत ठिय्या आंदोलन मागे घेतले जाणार नाही अशी आक्रमक भूमिका घेतल्याने माजी आमदार संजय चव्हाण यांनी हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी येत्या १६ तारखेला बांधकाम, भूसंपादन, महसूल या तिन्ही विभागांसह वकील संघाची संयुक्त बैठक बोलावण्याचे आश्वासन दिल्यानंतर ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले.आंदोलनात अ‍ॅड. सतीश चिंधडे, वसंतराव सोनवणे, सी. एन. पवार, संजय सोनवणे, रवींद्र पाटील, विष्णू सोनवणे, प्रकाश गोसावी, मधुकर सावंत, सोमदत्त मुंजवाडकर, नीलेश डांगरे, शोनकुमार देवरे,यशवंत सोनवणे, अभिमन्यू पाटील, रेखा शिंदे, सुजाता पाठक, सुरेखा ठाकूर, किरण देवरे, सरोज चंद्रात्रे आदि वकील सहभागी झाले होते. (वार्ताहर)