शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

मोबाइल अ‍ॅपद्वारे करा जनावरांची खरेदी-विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2017 00:23 IST

पशुपालक शेतकºयांना मध्यस्थ दलालांशिवाय जनावरांची खरेदी-विक्री करता यावी आणि होणारा वाहतूक खर्च वाचावा याकरिता नाशिकच्या स्नेहल गवळी व प्रीतम भट या तरुणांनी ‘अ‍ॅनी मार्ट-फार्मर्स गाइड’ या नावाचे मोबाइल अ‍ॅप्लिकेशन विकसित केले आहे. सदर मोबाइल अ‍ॅप हे विनामूल्य असून मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तीनही भाषांमध्ये उपलब्ध आहेत.

नाशिक : पशुपालक शेतकºयांना मध्यस्थ दलालांशिवाय जनावरांची खरेदी-विक्री करता यावी आणि होणारा वाहतूक खर्च वाचावा याकरिता नाशिकच्या स्नेहल गवळी व प्रीतम भट या तरुणांनी ‘अ‍ॅनी मार्ट-फार्मर्स गाइड’ या नावाचे मोबाइल अ‍ॅप्लिकेशन विकसित केले आहे. सदर मोबाइल अ‍ॅप हे विनामूल्य असून मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तीनही भाषांमध्ये उपलब्ध आहेत. स्नेहल गवळी व प्रीतम भट यांनी पत्रकार परिषदेत आपल्या संशोधनाची माहिती दिली. पशुपालक शेतकºयांकडून जनावरांची स्वखर्चाने वाहतूक करत बाजारात खरेदी-विक्री केली जाते. बाजारात पशुंची खरेदी-विक्री ही प्रामुख्याने दलालांमार्फत होत असते. त्यामुळे पशुपालकाला अपेक्षित किंमत मिळण्याची शाश्वती नसते शिवाय, कमिशनही मोजावे लागते. पशुपालकांची दलालांमार्फत होणारी फसवणूक टळावी यासाठी अ‍ॅनी मार्ट-फार्मर्स गाइड हे मोबाइल अ‍ॅप्लिकेशन विकसित करण्यात आले आहे. सध्या प्रत्येक शेतकºयाकडे मोबाइल असल्याने या अ‍ॅपद्वारे त्यांना सहजपणे जनावरांची खरेदी-विक्री करता येऊ शकेल. या अ‍ॅपमध्ये पशुंची विक्री करण्यासाठी विक्रेत्याचे नाव, पत्ता, मोबाइल नंबर, पशुचा प्रकार, पशुची जात, वय, अपेक्षित किंमत तसेच पशुचे छायाचित्र टाकण्याची सोय आहे. यात गायी, म्हशी, मेंढ्या या व्यतिरिक्त कुत्रे, घोडे व उंट यांची खरेदी-विक्री करणे सोपे होणार आहे. पशुंच्या वाहतूक दराचीही माहिती या अ‍ॅपमध्ये देण्यात आल्याचे प्रीतम भट यांनी सांगितले.विविध सेवाही उपलब्धअ‍ॅपमध्ये पशुपालनासंबंधी विविध सेवाही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यात ज्या भागात पशुपालक शेतकरी पशुपालन व्यवसाय करत असेल त्या भागातील पशुवैद्यकांचे पत्ते अंतर्भूत करण्यात आले आहेत. अनेकदा रात्री-अपरात्री जनावरांच्या औषधांची आवश्यकता भासते. अशावेळी परिसरात कोणत्या ठिकाणी औषधे उपलब्ध होतील त्याची माहिती देण्यात आली आहे. सदर सेवा विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.