शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

वाहनचोरी करणाºया टोळीचा पर्दाफाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 01:01 IST

चालकाच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून फोर्ड फिगो कार लांबविणाºया वाहनचोर टोळीचा पर्दाफाश करण्यात नाशिक ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश मिळाले आहे. चोरीला गेलेली कार पोलिसांनी जप्त केली आहे. वाहनचोर टोळीतील दोघांना पोलिसांनी अटक केली असून, अन्य तीन फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

सिन्नर : चालकाच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून फोर्ड फिगो कार लांबविणाºया वाहनचोर टोळीचा पर्दाफाश करण्यात नाशिक ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश मिळाले आहे. चोरीला गेलेली कार पोलिसांनी जप्त केली आहे. वाहनचोर  टोळीतील दोघांना पोलिसांनी अटक केली असून, अन्य तीन फरार आरोपींचा पोलीस शोध घेतआहेत.  वावी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून रविवारी (दि. ८) अज्ञात चौघा चोरट्यांनी चालक संतोष वसंत यादव (रा. मुसळगाव, ता. सिन्नर) याच्या ताब्यातील फोर्ड फिगो कार (क्र. एमएच ४३ एएफ ७०६७) चोरून नेली होती. सिन्नर येथील पंचवटी हॉटेलपासून या चौघांनी शिर्डी येथे दर्शनाला जायचे कारण सांगून संतोष यादव याची फोर्ड फिगो कार भाड्याने नेली होती.  शिर्डी येथे दर्शन आटोपून पुन्हा सिन्नरकडे येत असताना मीरगाव शिवारात लघुशंकेला थांबण्याचा बहाणा करून या चौघांनी चालकाच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून त्याच्याकडील २२ हजार रुपये व कार घेऊन पोबारा केला होता. या प्रकरणी वावी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात वाहनचोरीचा गुन्हा दाखल केला होता. वावी पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक रणजित आंधळे या प्रकरणी तपास करीत होते.  पोलीस अधीक्षक संजय दराडे, अपर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक कर्पे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक लगतच्या जिल्ह्यांमध्ये तपासासाठी रवाना करण्यात आले होते. वाहनचोरी करणाºया चोरट्यांची माहिती घेण्याचे काम या पथकाकडून सुरू होते.  याचवेळी गुप्त बातमीदाराच्या आधारे या गुन्ह्यातील आरोपी लगतच्या अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी व श्रीरामपूर भागातील असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक श्रीरामपूर व राहुरी भागात रात्रभर गस्त घालून सापळा रचून होते.जोगेश्वरी आखाडा शिवारातून (जि. नगर) या पथकाने संशयित आकाश संजय गायकवाड (१९), रा. उक्कलगाव ता. श्रीरामपूर व दीपक ऊर्फ बबलू पोपट कोबरणे (१९), रा. राहुरी यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरीला गेलेली कार ताब्यात घेतली. या चोरीत त्यांच्या सोबत संशयित राजू बाळू गुंजाळ (रा. उक्कलगाव, ता. श्रीरामपूर), किरण नानासाहेब दुशिंग (रा. उमरे, ता. राहुरी) व मनोज गोरख मांजरे (रा. मातापूर, ता. श्रीरामपूर) असे आणखी तिघे असल्याची माहिती तपासात पुढे आली. संशयितांना अटक करण्यासाठी व चोरीला केलेली कार ताब्यात घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकात आशिष अडसूळ, रवींद्र शीलावट, रवि वानखेडे, प्रीतम लोखंडे, दीपक अहिरे, प्रकाश चव्हाणके, दिलीप घुले, राजू दिवटे, अमोल घुगे, संदीप हांडगे, हेमंत गिलबिले, प्रदीप बहिराम, लहू भावनाथ, भाऊसाहेब टिळे हे पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते.नंबरप्लेट बदलून कारचा वापरसदर संशयित कारची नंबरप्लेट बदलून कार वापरत असल्याचे पोलिसांना आढळून आले. संशयितांची टोळी ही सराईत असून, त्यांच्याविरोधात अहमदनगर जिल्ह्यात यापूर्वी वाहनचोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या संशयित आरोपींकडून आणखी लूटमारीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.