शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

द्वारका सर्कलवर व्यापारी संकुल : फाळके स्मारक, पेलिकन पार्कचे रूप पालटणार बीओटीद्वारे प्रकल्पांची उभारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2018 00:52 IST

नाशिक : सन २०१८ मध्ये शहरातील काही मेगा प्रकल्प बीओटीद्वारे साकारण्याचा संकल्प महापालिकेचे आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी सोडला आहे.

ठळक मुद्दे प्रकल्पांना बीओटी व पीपीपी तत्त्वावर चालनापीपीपी तत्त्वावर विकास

नाशिक : सन २०१८ मध्ये शहरातील काही मेगा प्रकल्प बीओटीद्वारे साकारण्याचा संकल्प महापालिकेचे आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी सोडला असून, त्यात प्रामुख्याने द्वारका सर्कलवरील महापालिकेच्या जागेत व्यापारी संकुलाची निर्मिती करण्याबरोबरच पेलिकन पार्क आणि फाळके स्मारकाचा पुनर्विकास करण्यात येणार आहे.अभिषेक कृष्ण यांच्या आयुक्तपदाच्या कारकिर्दीला रविवारी (दि.७) दीड वर्षे पूर्ण होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी संवाद साधताना आयुक्तांनी सांगितले, नवीन वर्षात शहरातील काही मेगा प्रकल्पांना बीओटी व पीपीपी तत्त्वावर चालना देण्यात येणार आहे. त्यात द्वारका सर्कलवरील महापालिकेच्या जागेत व्यापारी संकुलाची निर्मिती केली जाणार आहे. सदर जागेतील व्यावसायिकांना व्यापारी संकुलात गाळेविक्री करताना प्राधान्य दिले जाणार असून, त्यासंदर्भात व्यावसायिकांनी संमतीही दर्शविली आहे. त्यांना गाळे उपलब्ध करून दिल्यास त्यांनी न्यायालयातील दावा मागे घेण्याची तयारी दाखविली आहे. याचबरोबर, सिडकोतील पेलिकन पार्कच्या जागेचाही पीपीपी तत्त्वावर विकास करण्यात येणार आहे. सदर जागेसाठी सल्लागार संस्थांनी दोन पर्याय सुचविले आहेत. त्यात अ‍ॅडव्हेन्चर पार्क उभारून महापालिकेने तिकीट विक्री करावी किंवा शेअरिंगमध्ये सदर प्रकल्प राबवावा. याशिवाय, आमदार सीमा हिरे यांनीही त्याठिकाणी नमो उद्यानाचा प्रस्ताव दिलेला असून तो शासनाकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आला आहे. त्याला मान्यता मिळाल्यास त्याचाही विचार होईल. फाळके स्मारकाचाही याच पद्धतीने विकास करण्याचे नियोजन आहे. या तीनही प्रकल्पांना महासभेची मंजुरी घेऊन प्रकल्पांना येत्या आर्थिक वर्षात चालना दिली जाणार असल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले.