कोंडी कायम : डोकेदुखी द्वारका सर्कलची (पालिका-पान७)नाशिक : मंुबई-आग्रा महामार्गावरील वाहतुकीची कोंडी सुटावी, या हेतूने उड्डाणपुलाची निर्मिती करण्यात आली असली तरी द्वारका सर्कलवरील वाहतुकीची समस्या अधिकच बिकट झाली आहे. सर्कलला कोंडी होतेच पण त्यातही भर पडते ती शहर बसेसची. ज्याठिकाणी थांबे आहेत तेथे बसेस न थांबता रस्त्यावरच थांबतात. त्यामुळे वाहतुकीच्या कोंडीत अधिकच भर पडते. मंुबई-आग्रा महामार्गावरील द्वारका चौक येथील वाहतूक कोंडीची समस्या मोठी आहे. महामार्गाच्या दोन्ही बाजूकडून सहा रस्ते आणि नाशिक - पुणे मार्गाचे चार तर वाकडी बारवकडून येणारा एक अशा दहा-बारा रस्त्यांची वाहतूक एकाच चौकात येत असल्याने वाहतूक कोंडीची समस्या अधिक गंभीर होते. सर्कल लहान करून वाहने गोलाकार फिरत मार्गस्थ होण्याऐवजी सर्वच वाहने मार्गस्थ होण्याच्या प्रयत्नात कोंडीची समस्या निर्माण होते. त्यात भर पडते ती पुण्याकडे जाणार्या आणि येणार्या रस्त्यावरील वाहनांची कोंडी. चौक सोडून पुणे मार्गावरील दोन्ही बाजूने काही अंतरावर शहर बस थांबे आहेत. पुण्याकडे जाताना लाकडाच्या वखारीनजीक शहर बसेससाठी थांबा आहे. याच थांब्यालगत अवैधरीत्या प्रवाशांची वाहतूक करणार्या काळ्या-पिवळ्या वाहनांची गर्दी असते. त्यामुळे प्रवासी शेडमध्ये उभ्या असलेल्या प्रवाशांना येणार्या बसचा अंदाज येत नाही. त्यामुळे ते निवारा शेड सोडून उभे राहतात. येणार्या बसेसही निवारा शेडलगत थांबणे अपेक्षित असताना रस्त्यावरच उभ्या राहतात. प्रवासी बसमध्ये चढेपर्यंत बस रस्त्यावरच थांबलेली असते. त्यामुळे बसच्या मागे असलेली वाहने रोखली जातात. लहान वाहने बसला ओलांडून जाऊ शकतात; परंतु चारचाकी व इतर वाहनांना जाणे शक्य होत नाही. त्यामुळे अवघ्या काही मिनिटांत एका बसमुळे वाहतूक रोखली जाऊन द्वारका सर्कलपर्यंत वाहने थांबलेली असतात. अर्थातच त्यामुळे द्वारका सर्कलच्या वाहतुकीवर अतिरिक्त ताण निर्माण होऊ कोंडी वाढते. त्याचप्रमाणे नाशिककडे येणार्या मार्गावरील कोंडाजी चिवडा दुकानालगत शहर बसचा थांबा असताना त्याही बसेस रस्त्यावरच थांबतात. त्यामुळे जी दुसर्या बाजूच्या रस्त्यावर स्थिती निर्माण होते तशीच स्थिती याहीठिकाणी होऊन समस्या वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. शेडलगत थांबण्याची गरजनिर्माण केलेल्या प्रवासी निवारा शेडलगत शहर बसेस थांबल्या तर इतर वाहनांना पुढे मार्गस्थ होण्यासाठी रस्ता मोकळा होतो आणि वाहतुकीची कोंडीही टळू शकते.
थांबा सोडून रस्त्यावर थांबतात बसेस
By admin | Updated: May 22, 2014 00:20 IST