शहरं
Join us  
Trending Stories
1
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
2
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
3
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
4
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
5
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
6
गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठेला ऐन वेळी धावाधाव नको, म्हणून 'ही' घ्या पूजासाहित्याची इत्थंभूत यादी आणि विधी! 
7
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
8
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?
9
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
10
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
11
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
12
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
13
चालू शूटिंगमध्ये कोसळले, सेटवरच ४७ वर्षीय दिग्दर्शकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
14
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
15
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
16
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
17
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
18
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
19
गणेशोत्सवात परीक्षा नको, अमित ठाकरे यांनी केली मागणी
20
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल

दुपारनंतर बसेस सुरू; मात्र पायपीट कायम

By admin | Updated: September 26, 2015 00:03 IST

गर्दी आवरेना : मेळा स्थानकात बसेसना पोलीस बंदोबस्त

नाशिक : भाविकांच्या संख्येचा अंदाज न येऊन नियोजन कोलमडल्याने बंद कराव्या लागलेल्या बसेस शुक्रवारी दुपारनंतर पुन्हा सुरू झाल्या; मात्र भाविकांची पायपीट कायम होती. भाविकांची गर्दी आवरत नसल्याने मेळा स्थानकातून पोलीस बंदोबस्तात बसेस सोडल्या जात होत्या. तिसऱ्या पर्वणीला त्र्यंबकेश्वर येथे जाण्यासाठी नाशिकमधून नाशिकरोड, महामार्ग, मेळा, निमाणी बसस्थानक आदि ठिकाणांहून बसेस सोडण्याचे नियोजन होते. रात्री अकरा वाजेनंतर ठिकठिकाणांहून भाविकांचा ओघ त्र्यंबकेश्वरकडे सुरू झाला. भाविकांच्या संख्येत विक्रमी वाढ होऊ लागल्याने अखेर पहाटे तीन वाजता बसेस थांबवण्यात आल्या. त्यानंतरही भाविक त्र्यंबककडे पायी निघाले होते. पहाटे तर भाविक अक्षरश: पपया नर्सरीपासूनच पायी रवाना होत होते. सकाळी ११ वाजेनंतर बसेस पुन्हा सुरू करण्यात आल्या. त्यातून दुपारी दीड वाजेपर्यंत भाविकांची वाहतूक सुरू होती; मात्र पुन्हा गर्दी वाढल्याने सायंकाळी ४ वाजेपर्यंत बसेस बंद करण्यात आल्या. गुरुवारी रात्रीपासून शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत मेळा स्थानकातून बसेसच्या अवघ्या पन्नास फेऱ्या झाल्याचे सांगण्यात आले. सदर बसेसद्वारे भाविकांना ब्रह्मा व्हॅलीपर्यंत सोडले जात होते. तेथून भाविकांना पायपीट करीतच त्र्यंबक गाठावे लागत होते. दरम्यान, भाविकांचा ओघ वाढल्याने पोलिसांनी खासगी वाहने पपया नर्सरीलाच रोखण्यास सुरुवात केली. त्यामुळे या परिसरात सायंकाळी भाविक व वाहनांची प्रचंड गर्दी झाली. बसेस भाविकांनी पूर्णत: भरून येत असल्याने पोलीस बळाचा वापर करीत त्यात भाविकांना बसवत होते. अनेक बसचालक व नियंत्रक पोलिसांना जागा नसल्याचे सांगूनही कित्येक बसेसमध्ये भाविक अक्षरश: कोंबले जात होते. पपया नर्सरी परिसरात दुपारी ११ ते ३ या वेळेत स्वत: पोलीस आयुक्त एस. जगन्नाथन परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. ग्रामीण पोलिसांशी संपर्कात राहून बसेस सोडण्याचे नियोजन करीत होते. (प्रतिनिधी)