शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीच्या दिमतीला  जिल्ह्यातील बसेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 01:03 IST

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान सामग्री पोहोचविणे आणि परत आणणे या कामासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागाच्या ४८६ बसेस आरक्षित करण्यात आल्यामुळे जिल्ह्यातील प्रवासी यंत्रणा कोलमडून पडली. जुने सीबीएस येथे ग्रामीण भागात धावणाऱ्या बसेसच नसल्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल झाले

नाशिक : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान सामग्री पोहोचविणे आणि परत आणणे या कामासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागाच्या ४८६ बसेस आरक्षित करण्यात आल्यामुळे जिल्ह्यातील प्रवासी यंत्रणा कोलमडून पडली. जुने सीबीएस येथे ग्रामीण भागात धावणाऱ्या बसेसच नसल्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल झाले. ऐन लग्नतिथीत स्थानकात बसेस नसल्यामुळे प्रवाशांना खासगी वाहनांचा वापर करावा लागला.लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य परिवहन महामंडळाने नाशिकसह जिल्ह्यातील डेपोंमधील सुमारे ४८६ बसेस निवडणुकीच्या दिमतीला दिल्या आहेत. त्यामुळे रविवारी मध्यरात्रीपासूनच जिल्ह्यातील बसेस या जमा करण्यात आल्याने स्थानकात बसेसच नसल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. बसेस नसल्याबाबतची सूचना देण्यात आली  नसल्याने प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. स्थानकात बस येण्याची वाट पाहून अनेकांनी अखेर तेथून काढता पाय घेत खासगी वाहनाने पुढील प्रवास केला.या निवडणुकीसाठी नाशिकसह निफाड, लासलगाव, इगतपुरी, पेठ आणि येवला या डेपोंमधील बसेसदेखील देण्यात आल्यामुळे नाशिकबरोबरच या डेपोंवरदेखील प्रवाशांची गैरसोय झाली. ग्रामीण भागातील डेपोंमधून आसपासच्या गावांमध्ये जाणाºया बसेसही धावत असल्यामुळे ग्रामीण भागातील प्रवासी वाहतूक बसेसवर अवलंबून असतात. मात्र जिल्ह्यातील डेपोंमध्ये बसेसच नसल्याने प्रवाशांना अनेक अडणींना सामोरे जावे लागले. ग्रामीण भागात एक-दोन बसेस सोडल्या तर अन्य मार्गावरील प्रवासी वाहतूक पूर्णपणे बंद होती. नाशिकमध्ये परराज्यातून येणाºया बसेसमधून अनेकांनी नाशिक गाठले तर एका गावातून दुसºया गावात जाणाऱ्यांना तर उन्हातान्हात पायी चालत जावे लागले. जिल्हाभरातील स्थानकात बसेस नसल्यामुळे ग्रामीण भागात ऐन लग्नसराईला प्रवाशांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले.काळी-पिवळी जीपचे डबल भाडेजिल्हाभरातील डेपोंमध्ये बसेसच नसल्यामुळे प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागला. जुने सीबीएस येथे बसेस न मिळाल्यामुळे प्रवाशांना द्वारका येथे जाऊन खासगी काळी-पिवळी जीपने पुढील प्रवास करावा लागला. मात्र बसेसची संख्या कमी असल्यामुळे खासगीचालकांनी प्रवाशांकडून दुप्पट भाडे आकारणी केली. त्यातच लग्नसराई असल्यामुळे प्रवाशांची संख्या मोठी असल्याने याचा लाभ उठवत खासगी चालकांनी प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा भाडे उकळले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnashik-pcनाशिक