शहरं
Join us  
Trending Stories
1
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
2
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
3
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
4
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
5
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
6
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
7
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
8
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
9
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
10
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
11
राज ठाकरेंचा मुद्दा, आशिष शेलारांनी दिले उत्तर; आभार मानत म्हणाले, 'त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याबद्दल...'
12
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
13
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
14
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
15
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
16
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
17
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
18
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
19
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
20
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार

पाटोदा-लासलगाव मार्गावर मोडकळीस आलेल्या बसेस

By admin | Updated: February 27, 2016 22:55 IST

दे धक्का : नियोजित मार्गातही केला जातो अचानक बदल

पाटोदा : येवला-पाटोदा- लासलगाव या मार्गावर येवला आगारातून प्रवाशांसाठी मोडकळीस आलेल्या व खिळखिळ्या झालेल्या नादुरुस्त बसेसचा वापर होत आहे, तसेच बसच्या नियोजित मार्गातही अचानक बदल केला जात असल्याने विद्यार्थी व प्रवाशांची गैरसोय होत आहे. हा प्रकार त्वरित थांबवावा अन्यथा कोणतीही पूर्वसूचना न देता तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा प्रवासी सदाशिव शिंदे यांनी आगारप्रमुखांना दिला आहे.पाटोदा व परिसरातून शेकडो प्रवासी व विद्यार्थी येवला येथे रोज बसने ये-जा करतात. लासलगाव ते येवला हे अंतर ३२ कि.मी. असल्याने या मार्गावर नेहमीच प्रवाशांची वर्दळ असते. परंतु आगाराकडून प्रवाशांना नेहमीच वेठीस धरले जात आहे. या मार्गावर फेऱ्या मारणाऱ्या बसेसच्या खिडक्या तुटलेल्या, सीट गायब, चालकाकडील दरवाजाची दयनीय अवस्था, खिडक्याच्या काचा गायब झालेल्या आहेत. नादुरुस्त, खराब रस्त्यावरून या बसेस धावल्या तर नुसता आवाज येतो. अशा नादुरुस्त बसेसचा आगाराकडून सर्रास वापर केला जात आहे. यामुळे तालुक्याचे ठिकाण गाठणे प्रवाशांना कठीण होत आहे. नादुरुस्त व खिळखिळ्या असल्याने ह्या बसेस कोठे बंद पडेल, याचा नेम नाही. अनेक बसेसना प्रवाशांना दरवाजा उघडण्यासाठी लाथा माराव्या लागतात. अनेकवेळा मार्गातच काही बसेस बंद पडत असल्याने प्रवाशांना सदर बसेस धक्का देऊन चालू कराव्या लागत आहे. असे प्रकार वारंवार घडत आहे. यामुळे प्रवासी खासगी वाहनांचा वापर करीत आहे. (वार्ताहर)