शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

रस्ते बुडाल्याने जिल्ह्यातील बस वाहतूक ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 00:32 IST

नाशिक : गेल्या चोवीस तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक रस्ते पाण्याखाली गेल्यामुळे जिल्ह्यातील संपूर्ण प्रवासी वाहतूक सेवा विस्कळीत झाली असून, अनेक ठिकाणी बसेस रस्त्यातच थांबवून ठेवण्यात आलेल्या आहेत. नाशिक-पुणे आणि नाशिक-धुळे वगळता इतर मार्गांवरील सर्व वाहतूक पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात आलेली आहे.

ठळक मुद्देपरिवहन सेवा विस्कळीत : धोकादायक पुलांमुळे मार्ग बंद

 

 

नाशिक : गेल्या चोवीस तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक रस्ते पाण्याखाली गेल्यामुळे जिल्ह्यातील संपूर्ण प्रवासी वाहतूक सेवा विस्कळीत झाली असून, अनेक ठिकाणी बसेस रस्त्यातच थांबवून ठेवण्यात आलेल्या आहेत. नाशिक-पुणे आणि नाशिक-धुळे वगळता इतर मार्गांवरील सर्व वाहतूक पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात आलेली आहे.जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे नदीला आलेला पूर आणि रस्त्यांवर साचलेल्या पाण्यामुळे प्रवासी वाहतूक सेवा करणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाची बससेवा दुपारी बारा वाजेनंतर पूर्ण विस्कळीत झाली. पेठ आणि सुरगाणा तालुक्यात जोरदार पाऊस सुरू असल्याने या मार्गावरील सर्व बसेस बंद करण्यात आलेल्या आहेत. या मार्गावरील अनेक लहान पूूल आणि फरशीपूल पाण्याखाली गेले आहेत. संभाव्य धोका लक्षात घेऊन या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. पेठ येथील रस्त्यांवर दोन ते तीन किलोमीटरपर्यंत रस्त्यांवरून पाण्याचे पाट वाहत आहे, तर काही ठिकाणी रस्त्यांना नदीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या मार्गावर कोणत्याही प्रकारच्या वाहतुकीला प्रशासनाने मनाई केलेली आहे. याबरोबरच इगतपुरी, त्र्यंबकेश्वर येथे अडीचशे ते तीनशे मि.मी. पाऊस होत असल्यामुळे या मार्गावरील अनेक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात साचलेले पाणी आणि ठिकठिकाणी खड्डे पडल्याने सुरक्षिततेच्या कारणास्तव या मार्गांवरील वाहतूक बंद करण्यात आल्याने बसेस थांबविण्यात आल्या तर काही बसेस माघारी पाठविण्यात आल्या आहेत.चांदवड, मनमाड, येवला आणि सटाणा येथील बससेवा वगळता अन्य मार्गांवरील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. नाशिक-पेठ मार्गावरील चापडगाव येथे पूल पाण्याखाली गेल्यामुळे या गावाचा संपर्क तुटला असल्याने वाहतूकही विस्कळीत झालेली आहे. तसेच कसारा घाटात दरड कोसळल्यामुळे घोटी-इगतपुरी मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली होती.