शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

बसस्थानकाने घेतला मोकळा श्वास

By admin | Updated: June 29, 2017 00:37 IST

सिन्नर : राज्य परिवहन महामंडळाची परवानगी न घेता सिन्नर बसस्थानकाच्या आवारात अनधिकृतपणे फलक लावणाऱ्यां-विरोधात आगारातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोहीम राबविण्यास प्रारंभ केला.

लोकमत न्यूज नेटवर्कसिन्नर : राज्य परिवहन महामंडळाची परवानगी न घेता सिन्नर बसस्थानकाच्या आवारात अनधिकृतपणे फलक लावणाऱ्यां-विरोधात आगारातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोहीम राबविण्यास प्रारंभ केला. मंगळवारी बसस्थानक आवारातील सुमारे ५० अनधिकृत फलक राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हटविले. त्यामुळे बसस्थानकाने मोकळा श्वास घेतला.  पालिका व महानगरपालिका हद्दीत सार्वजनिक ठिकाणी अनधिकृतपणे होर्डिंग व बॅनर लावणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश न्यायालयाने दिले असले तरी त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी होताना दिसत नाही. सार्वजनिक ठिकाणी कोणतीही परवानगी न घेता बॅनर व होर्डिंग लावून विद्रूपीकरणाचे काम सुरू राहाते. सिन्नर बसस्थानक आवारातही अनेकांनी वाढदिवस शुभेच्छा, दशक्रिया विधी, शैक्षणिक व व्यावसायिक जाहिराती असणारे  बॅनर राज्य परिवहन महामंडळाची परवानगी न घेता लावले असल्याचे दिसून येते. त्यामुुळे बसस्थानकाच्या संरक्षक भिंती जाहिरातीच्या  फलकांत हरवून गेल्याचे दिसत होते. गेल्या काही महिन्यांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी सिन्नरला भेट दिली होती. त्यावेळी महामार्गावरील अनधिकृत बॅनर पाहून त्यांनी पालिका प्रशासनाला खडे बोल सुनावले  होते. त्यानंतर पालिकेने अनधिकृत बॅनर जमा करण्याची मोहीम  राबविली होती. त्यानंतर काही दिवसांनी पुन्हा अनधिकृत बॅनर लावण्याचे काम शहरात ठिकठिकाणी सुरू आहे. त्यातून वर्दळीच्या ठिकाणी असणारे बसस्थानक अनधिकृत फलक लावणाऱ्यांचा केंद्रबिंदू ठरले होते.  यापूर्वीही राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोहीम राबवून दोनवेळा अनधिकृत फलक हटवले होते. मात्र जाहिरातदारांनी पुन्हा काही दिवसांच्या विश्रांतीनंतर सिन्नर आगाराच्या मालमत्तेवर अतिक्रमण करण्याचे धाडस करून जाहिरातींचे फलक लावले होते.१ नाशिक-पुणे महामार्गावर सिन्नर बसस्थानकासमोर नेहमीच वाहतूक कोंडी होत असते. बस स्थानकातून बाहेर पडताना अनेकदा त्यांचा अडथळा निर्माण होतो. महामार्गावरील वाहने बसचालकांना बस बाहेर घेताना दिसत नाही त्यामुळे अपघात होण्याचा धोका असतो. २ मंगळवारी आगार व्यवस्थापक भूषण सूर्यवंशी, स्थानकप्रमुख केशव सांगळे, वाहतूक नियंत्रक प्रमोद घोलप यांच्यासह कर्मचाऱ्यांनी बसस्थानकात आवारात व संरक्षक भिंतीवर लावण्यात आलेले फलक उतरविण्यास प्रारंभ केला. छोटे-मोठे सुमारे ५० फलक या कारवाईत खाली उतरविण्यात आले. व्यावसायिक जाहिरातीसह अनेक प्रकाराच्या फलकांमुळे सिन्नर बसस्थानकाचा श्वास एकप्रकारे कोंडला गेला होता. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी राबविलेल्या मोहिमेमुळे बसस्थानकाने मोकळा श्वास घेतला आहे.