देवळा : नगरपंचायतीतर्फे सीएफएल बल्ब बसविण्याचे काम सुरूदेवळा : देवळा नगरपंचायतीने शहर व परिसरातील सर्व पथदीपांवरील जुन्या ट्यूबलाईट बदलून नवीन सीएफएल बल्ब लावण्याचे काम हाती घेतल्याने अनेक दिवसांपासून अंधारात बुडालेला बसस्थानक परिसर तसेच शहर व उपनगरांतील अनेक पथदीप नादुरुस्त असल्याने तेथे अंधाराचे साम्राज्य होते तो सर्व भाग उजळून निघणार असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. देवळा ग्रामपालिकेचे नगरपंचायतीत रूपांतर झाल्यानंतर नगरपंचायतीच्या निवडणुका झाल्या. नगराध्यक्ष म्हणून धनश्री अहेर यांनी पदभार स्वीकारला. सुरुवातीला नगरपंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून प्रभारी अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली. परंतु या अधिकाऱ्यावर एकापेक्षा अधिक नगरपंचायतींच्या कामाचा अतिरिक्त भार आल्यामुळे देवळा नगरपंचायतीची अनेक कामे खोळंबली व शहरातील नागरिकांची गैरसोय झाली. देवळा नगरपंचायतीत चंद्रकांत भोसले यांची मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून महिनाभरापूर्वी नेमणूक करण्यात आल्याने शहरातील विकासकामांना चालना मिळाली आहे. पथदीपांसाठी सतत होणारा दुरुस्तीचा खर्च तसेच नागरिकांच्या तक्रारी यातून तोडगा काढण्यासाठी देवळा नगरपंचायतीने शहरातील पथदीपांवरील सर्व ट्यूबलाईट बदलून दीर्घकाळ चालणारे व कमी वीज लागणारे सीएफएल बल्ब लावण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी एकूण १३५० सीएफएल बल्ब पथदीपांवर बसविण्याचे काम नगरपंचायतीचे कर्मचारी दत्तात्रय बच्छाव, सुनील शिलावट आदि करीत आहेत. यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. (वार्ताहर )
बसस्थानक उजळणार
By admin | Updated: October 13, 2016 00:16 IST