शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

शहरात बससेवा विस्कळीत; प्रवाशांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 00:39 IST

मराठा क्र ांती मूक मोर्चाच्या वतीने बुधवारी (दि.२५) मराठा आरक्षण तसेच अन्य विविध मागण्यांसाठी पुकारण्यात आलेल्या नाशिक बंदच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाच्या वतीने एसटी बससेवा बंद करण्यात आल्याने प्रवाशांचे हाल झाले.

पंचवटी : मराठा क्र ांती मूक मोर्चाच्या वतीने बुधवारी (दि.२५) मराठा आरक्षण तसेच अन्य विविध मागण्यांसाठी पुकारण्यात आलेल्या नाशिक बंदच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाच्या वतीने एसटी बससेवा बंद करण्यात आल्याने प्रवाशांचे हाल झाले. दुपारपर्यंत बससेवा विस्कळीत झाल्याने प्रवाशांना रिक्षाने तसेच पायी प्रवास करून इच्छितस्थळी जावे लागले. एसटीची शहरातील सेवा विस्कळीत झाल्याने अंदाजे लाखो रु पयांचा फटका एसटी महामंडळाला बसला असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.  काल मंगळवारी (दि.२४) सायंकाळी काही आंदोलनकर्त्यांनी एसटी बसेसच्या काचा फोडून नुकसान केल्याने व त्यातच बुधवारी नाशिक बंदची हाक दिल्याने एसटीचे नुकसान होऊ नये यासाठी बुधवारी पंचवटी बस आगारातून एकही बस शहरात फेरीसाठी काढण्यात आलेली नव्हती. पंचवटी आगारात १००हून अधिक बसेस संख्या असून, बुधवारी दुपारपर्यंत एकही बस शहरातील रस्त्यावर धावली नाही.  बुधवारी सकाळपासूनच शहरातील बससेवा विस्कळीत झाल्याने चाकरमान्यांची तसेच शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची गैरसोय झाली होती. परिसरातील अनेक ठिकाणच्या बसथांब्यांवर प्रवाशांनी गर्दी केली होती, मात्र बससेवा बंद असल्याचे समजतात त्यांनी रिक्षाने पुढचा प्रवास केला.रिक्षाचालकांची चंगळशहरातील एसटी बससेवा विस्कळीत झाली होती. प्रवाशांना इच्छितस्थळी जाण्यासाठी रिक्षाने प्रवास करावा लागला. रिक्षाचालकांनी बस बंदचा पुरेपूर फायदा घेत रिक्षात क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक करून नियमांची उघडपणे पायमल्ली केली असल्याचे चित्र शहरभर दिसून आले.

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा