शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांच्या रेट्याने बससेवा पुर्ववत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 19:38 IST

पिंपळगाव बसवंत : गेल्या चार महिन्यांपासून बंद असलेली पिंपळगाव-धोंडगव्हाणमार्गे वडनेर भैरव-बहाद्दुरी जाणाऱ्या बस फेºया विद्यार्थी व ग्रामस्थांच्या विनंतीवरून सुरू करण्यात आल्या आहेत. गुरुवारी (दि.१८) बस फेºया सुरू केल्यानंतर आगारप्रमुख संध्या जाधव यांच्या तत्परतेने बस फेºया सुरू झाल्याबद्दल विद्यार्थ्यांनीे त्यांचा सत्कार केला.

ठळक मुद्देपिंपळगाव बसवंत : आगारप्रमुखांनी पाहणी करून मार्ग केला सुकर

पिंपळगाव बसवंत : गेल्या चार महिन्यांपासून बंद असलेली पिंपळगाव-धोंडगव्हाणमार्गे वडनेर भैरव-बहाद्दुरी जाणाऱ्या बस फेºया विद्यार्थी व ग्रामस्थांच्या विनंतीवरून सुरू करण्यात आल्या आहेत. गुरुवारी (दि.१८) बस फेºया सुरू केल्यानंतर आगारप्रमुख संध्या जाधव यांच्या तत्परतेने बस फेºया सुरू झाल्याबद्दल विद्यार्थ्यांनीे त्यांचा सत्कार केला.मागील चार महन्यांपासून धोंडगव्हाणमार्गे वडनेर भैरव, बहाद्दुरीला जाणाºया बसचा मार्ग रस्त्याचे काम चालू असल्याने बदलण्यात आला होता. अनेक दिवसांपासून जवळपास दोनशे विद्यार्थी व प्रवाशांचे हाल सुरू होते.यात धोंडगव्हाण, पाचोरे वणी येथील प्रवाशांना पाच किलोमीटर पर्यंत पायपीट करावी लागत होती. गुरुवारी महाविद्यालयात शिकणारे विद्यार्थी मोनाली चौरे, दीपाली तिडके, अश्विनी थेटे, पूजा परदेशी, रोहिणी परदेशी, ऋतुजा कतवारे, काजल पूरकर, प्रतिक्षा उगले, अंकित कतवारे, अंजिम शेख, ज्ञानेश्वर थेटे यांनी आगारप्रमुख संध्या जाधव यांची भेट घेऊन बसच्या फऱ्यांअभावी होणाºया त्रासाची आपली कैफियत मांडली. कुठलाही तोडगा ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसलेल्या विद्यार्थी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सोबत घेऊन रस्त्याची पाहणी केली. त्यानंतर धोंडगव्हाण येथे पोहचल्यावर बससेवा सुरळीत सुरु करण्यात येईल असे आश्वासन आगार प्रमुखांनी दिले. त्यामुळे विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्तकेले.विद्यार्थी व ग्रामस्थांच्या विनंतीवरून गुरुवारी आम्ही रस्त्याची पाहणी केली. त्यानंतर बससेवा पुर्ववत सुरू करण्यात आली आहे. रस्ता अरुंद असल्याने इतर वाहनधारकांनी बसचालकांना सहकार्य करावे.- संध्या जाधव, आगारप्रमुख, पिंपळगाव बसवंत.