शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

बसवाहकास मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 00:52 IST

पिंपळगाव बसवंत : महिलेला बसस्थानकाऐवजी बायपासवर का उतरून दिले, अशी कुरापत काढून पुणे-सटाणा बसच्या वाहकास मारहाण केल्याची घटना पिंपळगाव बसवंत येथे मंगळवारी (दि. १३) रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देमहिलेला बसस्थानकाऐवजी बायपासवर का उतरून दिले कुरापत काढून पुणे-सटाणा बसच्या वाहकास मारहाण

पिंपळगाव बसवंत : महिलेला बसस्थानकाऐवजी बायपासवर का उतरून दिले, अशी कुरापत काढून पुणे-सटाणा बसच्या वाहकास मारहाण केल्याची घटना पिंपळगाव बसवंत येथे मंगळवारी (दि. १३) रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली.या प्रकरणी पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी (दि. १३) रात्री पुणे-सटाणा बसमधून प्रवास करणाऱ्या पिंपळगाव येथील महिलेच्या निवंतीवरून येथील बायपासवर बस थांबवण्यात आली. महिला खाली उतरली. याचवेळी रोडवर उभे असलेले राजू बूब व प्रमोद बागलाणे (दोघे, रा. पिंपळगाव) व अन्य साथीदारांनी अरेरावी करत महिलेला स्थानकात न उतरवता रोडवर का उतरून दिले अशी कुरापत काढून वाहक देवराम विश्वनाथ टाले रा. सटाणा यास बेदम मारहाण केली.सदर बसला पिंपळगावी थांबा नाही महिलेच्या विनंतीवरूनच येथे त्यांना उतरून दिल्याचे सांगितले. मात्र त्यांनी काही ऐकून न घेता वाहकास मारहाण केली. व सदर बस स्थानकात नेली. स्थानकातही या तरुणांनी वाहकास पुन्हा मारहाण केली. या प्रकरणी वाहक देवराम विश्वनाथ टाले व चालक रवींद्र अशोक कदम यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. राजू बूब, प्रमोद बागलाणी व अन्य काहीजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक एकनाथ भोईर, राजू जाधव अशोक कदम करीत आहेत.