शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

ठेंगोड्यात घरफोडी; ९० हजारांचा ऐवज लंपास

By admin | Updated: November 5, 2016 00:05 IST

ठेंगोड्यात घरफोडी; ९० हजारांचा ऐवज लंपास

ठेंगोडा : येथील ग्रामपंचायत सदस्य मधुकर व्यवहारे बाहेरगावी गेल्याची संधी साधत बाजारपेठेतील भरचौकात रात्री घराचे कुलूप उघडून चोरट्यांनी दहा हजार रुपये रोख रक्कमेसह सोन्याच्या पाच अंगठ्या, लक्ष्मीची मूर्ती, चांदीची भांडे आदिंसह ९० हजार रुपये किमतीच्या मुद्देमालावर चोरट्यांनी डल्ला मारल्याने परिसरात भुरट्या चोरांनी पुन्हा डोके वर काढले आहे.दरम्यान, व्यवहारे बाहेरगावाहून उशिरा घरी पोहोचल्यावर त्यांना घरातील अस्ताव्यस्त सामान बघितल्यानंतर चोरी झाल्याचे लक्षात आले. घटनेची माहिती सटाणा पोलिसांना मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक गुरव यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.  घटनास्थळावरील वस्तूंची ठसे तज्ज्ञांकडून तपासणी करून तसेच सीसीटीव्ही फुटेज तपासून चोरट्याचा शोध घेण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले. सातत्याने होणाऱ्या घरफोड्यांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. सटाणा पोलीस  स्टेशनचे पोलीस निरीक्षक बशीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार जाधव अधिक तपास करीत आहेत. (वार्ताहर)इसमाच्या मृत्यूप्रकरणी अहवाल पाठविणारघोटी : इगतपुरी तालुक्यातील वैतरणा परिसरातील आवळी शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात इसमाचा मृत्यू झालेल्या घटनेबाबत जबाबदारी झटकणाऱ्या वनविभाग मात्र खडबडून जागा झाला आहे. वनविभाग व पोलिसांच्या पथकांनी गुरुवारी घटना स्थळी जाऊन पाहणी करून पंचनामा करत अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठविण्याचे आश्वासन दिले. तसेच मृत इसमाच्या कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले.  इगतपुरी तालुक्यातील वैतरणा परिसरात बिबट्याचा मुक्त संचार असल्याने तसेच हा बिबट्या काही दिवसांपूर्वी एका आश्रमशाळेत शिरल्याने वनविभागाने बंदोबस्त करावा, अशी मागणी श्रमजीवी संघटनेने अनेकदा केली होती. मात्र वनविभागाने या मागणीला गांभीर्याने न घेता दुर्लक्ष करण्यात आले होते. अखेर या बिबट्याच्या हल्ल्यात आवळी येथील पंढरी किसन वाघ हा इसमाचा जंगलात मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला होता. दरम्यान, याही प्रकाराचा वन विभागाने इन्कार करीत जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला होता. तत्काळ वनपाल सोनवणे, वन रक्षक निकम, पोलीस हवालदार जगताप आदिंच्या पथकांनी घटनास्थळी जाऊन पाहणी आणि पंचनामा केला. यावेळी श्रमजीवी कार्यकर्ते रामचंद्र मुकणे, संतू ठोंबरे आदि उपस्थित होते. सदरील अहवाल वरिष्ठांकडे पाठवून मृताच्या वारसांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, अशी माहिती वनविभागाच्या पथकाने श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांना दिली. (वार्ताहर)