नाशिक : काठेगल्लीतील बनकर चौकातील शिवनेरी अपार्टमेंटमध्ये एका बंद घराला चोरट्यांनी लक्ष्य करत दागिन्यांसह पल्सर दुचाकी असा सुमारे ६० हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात अज्ञात संशयितांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सीमा अनंत गोकन (४०) हे काही कामानिमित्त बाहेरगावी गेले असता अज्ञात चोरट्यांनी शिवनेरी अपार्टमेंटमध्ये प्रवेश करून त्यांची ३ क्रमांकाची बंद सदनिका फोडून त्यामध्ये प्रवेश करत चोरट्यांनी ७० ग्रॅम वजनाचे चांदीचे देव, ५० ग्रॅम वजनाची चांदीची गणपती मूर्ती, दोन ग्रॅमचे सोन्याचे गंठण त्यामध्ये सोन्याचे मणी, वाट्या, अर्धा ग्रॅमची सोन्याची नथ, ४३ इंची एलईडी टीव्ही, पल्सर दुचाकी असा सुमारे ५९ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरट्यांनी गायब केल्याचे गोकन यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
घरफोडीत दागिन्यांसह दुचाकीही लांबविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 00:36 IST
नाशिक : काठेगल्लीतील बनकर चौकातील शिवनेरी अपार्टमेंटमध्ये एका बंद घराला चोरट्यांनी लक्ष्य करत दागिन्यांसह पल्सर दुचाकी असा सुमारे ६० हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात अज्ञात संशयितांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घरफोडीत दागिन्यांसह दुचाकीही लांबविली
ठळक मुद्देसुमारे ५९ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरट्यांनी गायब