शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सातपूरला बंटी-बबलीचा थरार

By admin | Updated: September 30, 2015 00:07 IST

सातपूरला बंटी-बबलीचा थरार

सातपूर : वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे त्रस्त असलेल्या सातपूरकरांना मंगळवारी (दि़२९) आणखी एक धक्का बसला़ भर दुपारी एका बंगल्यात शिरून घरमालकाला बांधून ठेवत एका तरु ण-तरु णीने धाडसी घरफोडी करून पलायन केल्याची घटना घडली आहे़ हिंदीतील ‘बंटी और बबली’ या चित्रपटाप्रमाणे घडलेल्या या घटनेने पोलिसांना आव्हान दिले आहे.गेल्या महिन्यात मौले हॉलजवळील संदीप नगरमध्ये राहणारे डॉ. सुदाम चौधरी यांच्या घरावर तिघांनी धाडसी दरोडा टाकल्याची घटना ताजी असताना मंगळवारी पुन्हा त्याच भागातील नीलकंठेश्वर नगरमध्ये राहणारे मायको (बॉश) कंपनीतील सेवानिवृत्त कामगार शंकर बोरसे यांच्या बंगल्यात भरदुपारी घरफोडी झाली. दुपारी एक वाजेच्या सुमारास शंकर बोरसे हे बंगल्यात एकटे असताना एक युवती (अंदाजे वय २०) व एक युवक (अंदाजे वय ३०) घरात आले. या दोघांनी चाकूचा धाक दाखवून बोरसे यांना घरातील प्लास्टिक खुर्चीला बांधून ठेवले व धमकावत किमती ऐवजांची मागणी केली. यानंतर स्वत:च बंगल्यात शोध घेऊन कानातील सोन्याचे टॉप्स, मंगळसूत्र असा सुमारे २५ हजार रु पयांचे दागिने व खिशातील रोख दीड हजार रु पये असा २६ हजार ५०० रु पयांचा मुद्देमाल घेऊन या दोघांनी पलायन केले. यानंतर घाबरलेल्या बोरसे यांनी ओरड केल्याने शेजारच्या बंगल्यात राहणाऱ्या महिलांनी धाव घेत बोरसे यांची सुटका केली. या कालावधीत बोरसे यांच्या पत्नी नातेवाइकांकडे गेलेल्या होत्या. या प्रकारणी बोरसे यांनी सातपूर पोलिसात फिर्याद दिली आहे़दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त श्रीकांत धिवरे, सहायक पोलीस आयुक्त अतुल झेंडे, सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज करंजे यांनी भेट देऊन सविस्तर माहिती घेतली. यावेळी ठसे तज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले होते. या घटनेमुळे ‘बंटी और बबली’ या चित्रपटाची आठवण झाली. भर दिवसा झालेल्या या घटनेमुळे परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मनीष पोटे करीत आहेत. (वार्ताहर)