शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत बांधकामांना दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 21:08 IST

येवला : येवल्यातील अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांना उच्च न्यायालयाने चांगलाच दणका दिला आहे. अतिक्रमणावरील स्थगिती आदेशाचे दावे जास्तीत जास्त सहा महिन्यांत निकाली काढण्याचे आदेश उच्च न्यायलायाने एका सुनावणीमध्ये दिले आहेत.

ा सामाजिक कार्यकर्ता दीपक पाटोदकर यांनी सन २००२ मध्ये उच्च न्यायालयात सिटी सर्व्हे क्र मांक ३९०७, ३९०८, ३८०७, ३८०८ मधील बेकायदेशीर बांधकामाविरुद्ध जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेतील वेळोवेळी झालेल्या निर्णयानुसार येवला नगरपालिकेने येथील शेकडो बांधकामे जमीनदोस्त केली होती. त्या ठिकाणी जनहित याचिकेतील निर्णयाचा अवमान करून काही व्यावसायिकांनी पुन्हा दुकाने थाटली होती. या बाबतीत पाटोदकर यांनी उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली होती. ही अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचा घाट काहींनी घातला होता.अ‍ॅडव्होकेट जनरल यांनी त्या संदर्भात उच्च न्यायालयात सूचक वक्तव्य केलेले होते; परंतु पाटोदकर यांनी तीव्र विरोध केला. अशी सर्व परिस्थिती असताना त्या भूखंडामधील सात अतिक्रमणधारकांना पूर्वीच वेगवेगळ्या न्यायालयात धाव घेऊन मनाई हुकूम मिळविण्यात यश आले होते. शहरातील इतर अनधिकृत बांधकामे पडत असताना काहींना मनाई हुकूम मिळाल्याने त्यांची बांधकामे ताठ मानेने उभी होती. अनधिकृत बांधकामे न्यायप्रविष्ट असल्यामुळे ती पाडण्यात आली नव्हती.उच्च न्यायालयातील जनहित याचिकेतील अर्जात न्यायाधीश रंजित मोरे व अनुजा प्रभुदेसाई यांच्या खंडपीठाने ३० जुलै २०१८ रोजी निकाल पारित केला. त्यास उच्च न्यायालयाने निकालाची प्रत मिळाल्यापासून नियमित दिवाणी अपील जलदगतीने ६ महिन्याच्या आत निकाली काढण्यात यावे, असे निफाड येथील न्यायालय यांना निर्देश दिले आहेत. तसेच येवले येथील दिवाणी न्यायालय यांना दिवाणी मुकदमा क्र . १९९/२००० जलद गतीने १ वर्षाचे आत निकाली काढण्यात यावे, असे निर्देश दिले. यामुळे पाटोदकर यांचा सदरचा अर्ज निकाली निघाला. यासाठी याचिकाकर्ते दीपक पाटोदकर यांच्यातर्फे अ‍ॅड. ए. आर. एस. बक्षी यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :Courtन्यायालय