शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम साहित्य पुन्हा रस्त्यावर

By admin | Updated: June 18, 2014 01:17 IST

बांधकाम साहित्य पुन्हा रस्त्यावर

नाशिक : शहरात बांधकामे करताना रस्त्याच्या कडेला रेबिट मटेरियल किंवा दगडविटा असे बांधकामाचे साहित्य परस्पर टाकणाऱ्यांना मनपाने तंबी दिली असली, तरी शहरातील अनेक भागांत रस्त्यांवर बांधकाम साहित्य टाकण्याचे प्रमाण वाढले आहे. कोणत्याही ठिकाणी बांधकामे सुरू झाल्यानंतर अगोदरचे बांधकाम तोडणे किंवा बांधकामाचे उर्वरित साहित्य कुठेही टाकून दिले जाते. मोकळ्या मैदानावर तर विशेष करून टाकले जाते.(प्रतिनिधी)इंद्रप्रस्थ पूल, गंगापूर धरण परिसर आणि इंदिरानगर या शिवार रस्त्याच्या कडेला बांधकामाचे साहित्य टाकले जाते. हे साहित्य अस्वच्छतेत भर घालत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर महापालिकेने दंडात्मक कारवाई सुरू केली होती. यापुढे ही समस्या उद्भवू नये यासाठी बांधकामे करण्यापूर्वी महापालिकेच्या नगररचना विभागाला अशा साहित्याची विल्हेवाट कुठे लावणार त्याची हमी द्यावी लागते. तसा नियमही तयार करण्यात आला असल्याची माहिती तत्कालीन आयुक्त संजय खंदारे यांनी दिली होती; मात्र गेल्या काही दिवसांपासून शहरातील मखमलाबादरोड, पेठरोड, गंगापूर नाका-हनुमानवाडी लिंकरोड, इंदिरानगर, अंबड, सातपूर आदि भागांत रस्त्यांच्या कडेला बांधकाम साहित्य पडून असल्याचे दिसून येते. या बांधकाम साहित्यामुळे परिसराला बकाल स्वरूप आले आहे. तसेच यामुळे अनेकदा रस्त्यात अडथळा निर्माण होऊन अपघाताच्या घटना घडत आहेत. यावरून पालिकेची कारवाई मंदावली की काय, अशी चर्चा सुरू आहे.