शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बिटको हॉस्पिटलचे बांधकाम रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 16:46 IST

नाशिक : महापालिकेमार्फत नाशिकरोड येथे उभारण्यात येत असलेल्या बिटको हॉस्पिटलच्या नवीन इमारतीचे बांधकाम रखडल्याने त्याबाबत स्थायी समितीच्या सभेत सदस्यांनी प्रशासनाला जाब विचारला. यावेळी, सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी सदर बांधकामाची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण व्हावी यासाठी कामांवर देखरेख ठेवण्यासाठी समिती नियुक्त करण्याचे जाहीर केले.स्थायी समितीच्या सभेत सूर्यकांत लवटे यांनी बिटको रुग्णालयाच्या ...

नाशिक : महापालिकेमार्फत नाशिकरोड येथे उभारण्यात येत असलेल्या बिटको हॉस्पिटलच्या नवीन इमारतीचे बांधकाम रखडल्याने त्याबाबत स्थायी समितीच्या सभेत सदस्यांनी प्रशासनाला जाब विचारला. यावेळी, सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी सदर बांधकामाची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण व्हावी यासाठी कामांवर देखरेख ठेवण्यासाठी समिती नियुक्त करण्याचे जाहीर केले.स्थायी समितीच्या सभेत सूर्यकांत लवटे यांनी बिटको रुग्णालयाच्या इमारतीचे काम अपूर्ण असतानाही प्रशासनाने अन्य साहित्य खरेदीचा सपाटा लावल्याचा आरोप केला. याशिवाय, सदर इमारत सात मजली बांधण्याचे प्रस्तावित असताना ती पाच मजलीच बांधण्यात येत असल्याने विविध वार्डची कुठे उभारणी करणार, असा सवालही उपस्थित केला. त्यावर स्पष्टीकरण देताना वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय डेकाटे यांनी सांगितले, सदर इमारत आधी सात मजली करण्याचे प्रस्तावित होते परंतु, काही कारणास्तव ती पाच मजली करण्यात आली. मात्र, तळमजल्यावरील मोकळ्या जागेचे रूपांतर सर्जरी, मेडिसीन या वार्डमध्ये करता येऊ शकेल. याशिवाय, हॉस्पिटलसाठी सध्या ४५० कर्मचारीवर्ग आहे. त्यातही वाढ करणे गरजेचे होणार आहे. निवृत्तांच्या बदल्यात सुमारे २५५ कर्मचारी भरतीचा प्रस्ताव आयुक्तांकडे दिला असल्याचेही डेकाटे यांनी सांगितले. लवटे यांनी मात्र, हॉस्पिटलमधील तळमजल्यावरील भिंतींचे बांधकाम तोडावे लागणार असल्याचे सांगत त्यामुळे महापालिकेचे मोठे नुकसान होणार असल्याकडे लक्ष वेधले. मुशीर सय्यद यांनीही बेडच्या संख्येनुसार स्वच्छतागृहाची सुविधा उपलब्ध करून देण्याची सूचना केली. चर्चेनंतर सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी हॉस्पिटलच्या रखडलेल्या बांधकामांबद्दल नाराजी व्यक्त करत बांधकाम प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण व्हावी यासाठी समिती नियुक्त केली जाणार असल्याचे जाहीर केले. यावेळी शशिकांत जाधव यांनी सिडको व सातपूर भागात २०० बेडच्या हॉस्पिटलची आवश्यकता असल्याचे सांगत त्याबाबत कार्यवाहीची सूचना केली.