शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम व्यावसायिकांना दोन वर्षे कैद

By admin | Updated: September 2, 2016 01:22 IST

ग्राहक तक्रार निवारण मंच : खरेदीखत न नोंदविल्याने शिक्षा

 नाशिक : राज्य ग्राहक तक्र ार निवारण मंचच्या आदेशाचे पालन न केल्याचा ठपका ठेवत चार बांधकाम व्यावसायिक आणि जागा मालकांना नाशिक जिल्हा ग्राहक तक्र ार निवारण मंचने दोन वर्षे साधी कैद अशी शिक्षा ठोठावली आहे. तसेच संबंधिताना प्रत्येकी दहा हजार रुपयांचा दंडही सुनावण्यात आला. इमारतीतील सदनिकाधारकांना खरेदीखत नोंदवून देण्याच्या आदेशाचे पालन न केल्याबद्दल ही शिक्षा ठोठावण्यात आली आहे.यशवंत महाराज पटांगण परिसरातील गंगा मंदिर सहकारी हौसिंग सोसायटीच्या दाव्यात ए. जी. बिल्डर्सचे भागीदार नंदकिशोर अवधूत आघारकर, प्रवीण हरिभाऊ धात्रक, पांडुरंग दत्तात्रय बोधले आणि नितीन हरिभाऊ धात्रक यांना दोषी धरून शिक्षा सुनावण्यात आली. असल्याचे तक्रारदारांचे वकील दिनेश रणदिवे यांनी सांगितले. इमारतीत सदनिका घेतल्यापासून ग्राहक खरेदीखत करून देण्यासाठी संबंधितांकडे पाठपुरावा करत असताना संबंधित टाळाटाळ करीत असल्याने सोसायटीचे अध्यक्ष रामचंद्र वझे यांनी प्रथम जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे दाद मागितली होती. मात्र, मुदतीच्या मुद्द्यावरून मंचाने तो दावा निकाली काढला. ही जागा विकसित करताना जो करारनामा केला गेला, त्याचे मुद्रांक शुल्कच भरलेले नव्हते. सोसायटीच्या संमतीविना रहिवासी जागा व्यावसायिक वापर अशी बदलण्यात आली. सोसायटीला बांधकाम पूर्णत्वाचा दाखला मिळालेला नव्हता. त्यामुळे रहिवाशांचे खरेदीखत नोंदविले जात नसल्याचे स्पष्ट झाले. या सर्व बाबी लक्षात घेऊन मंचने राज्य ग्राहक तक्र ार निवारण मंचाच्या आदेशाचे पालन केले नसल्याचा ठपका ठेवत बांधकाम व्यावसायिक-जागा मालकांना दोषी ठरविले. याप्रकरणी आघारकर, प्रवीण व नितीन धात्रक आणि बोधले या चार जणांना दोन वर्षांची साधी कैद ठोठावण्यात आली. तसेच संबंधिताना प्रत्येकी दहा हजार रु पये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. याबाबतची माहिती तक्र ारदाराचे वकील अ‍ॅड. दिनेश रणदिवे यांनी दिली. जिल्हा ग्राहक तक्र ार निवारण मंचाचे अध्यक्ष मिलिंद सोनवणे, सदस्या प्रेरणा काळोखे- कुलकर्णी आणि कारभारी जाधव यांनी हा निकाल दिला. दोषींनी न्यायालयात दंडाची रक्कम भरली. या प्रकरणात जामीन मिळवला आहे. (प्रतिनिधी)