नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यात अनेक सेवाभावी संस्थांनी विविध उपक्रम राबविले, त्याचप्रमाणे शासकीय व शासनाशी संलग्न संस्थांनीदेखील आपले कार्य सेवाभावी वृत्तीने केले. त्यात भारत दूरसंचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) मधील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी भाविकांसाठी संपर्क यंत्रणा रात्रंदिवस कार्यरत ठेवून आपली सेवा बजावली.सिंहस्थ कुंभमेळ्यात तपोवनातील रामसृष्टी उद्यानात बीएसएनएलच्या वतीने स्वतंत्र संपर्क केंद्र सुरू करण्यात आले होते. याठिकाणी १० अधिकारी व कर्मचारी हे भाविकांना लोकल कॉल, एसटीडी कॉल, इंटरनेट, मोबाईल, पेपर व्हाउचर्स आणि रिचार्ज टॉप आॅफ आदि सुविधा पुरवित होते. त्याचप्रमाणे मोफत वायफाय सुविधादेखील पुरविण्यात आली. विशेष म्हणजे तिन्ही पर्वणी काळात एकूण ९ दिवस अधिकारी व कर्मचारी या कामासाठी कार्यरत होते. याशिवाय रामकुंड, साधुग्राम सेक्टर कार्यालय, काळाराम मंदिर त्याचप्रमाणे त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त, स्वामी समर्थ केंद्र आणि तहसील कार्यालयानजीक अशा ९ ठिकाणी १५० अधिकारी व कर्मचारी या कामात गुंतले होते. अशी माहिती सहाय्यक व्यवस्थापक एन. बी. पाटोळे यांनी दिली. यावेळी अरुण कुलथे व नरेश कोठावदे उपस्थित होते. (प्रतिनिधी)
बीएसएनएलची सेवाभावी कामगिरी
By admin | Updated: September 22, 2015 23:00 IST