शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

बीएसएनएलची ब्रॉड बॅण्ड सुविधा कोलमडली

By admin | Updated: August 10, 2014 02:03 IST

बीएसएनएलची ब्रॉड बॅण्ड सुविधा कोलमडली

 

नाशिक : इंटरनेट सुविधा पुरविण्यासाठी खासगी कंपन्यांमध्ये पराकोटीची स्पर्धा सुरू असताना, देशभरात सर्वाधिक जाळे असणाऱ्या भारत दूर संचार निगमची (बीएसएनएल) अंबड औद्योगिक वसाहतीतील ब्रॉड बॅण्ड सुविधा आज दिवसभर कोलमडली होती. त्यामुळे बीएसएनएलच्या ग्राहकांना नको त्या कटकटीला सामोरे जावे लागलेच परंतु ज्यांचा व्यवसायच या सुविधेवर अवलंबून असतो, त्यांना मात्र कोट्यवधींचा फटका बसला आहे. टु-जी नंतर थ्री-जी सुविधा आणि आता फोर-जी सुविधा करण्याची खासगी कंपन्यांमध्ये चढाओढ लागलेली असताना सर्वात मोठी ग्राहक संख्या असलेल्या बीएसएनएलला मात्र आहे ती सुविधा देण्यातही तत्परता दाखविता येत नसल्याने त्यांचा हक्काचा ग्राहक खासगी कंपनीकडे वळू लागला आहे. भ्रमणध्वनीच्या रेंजमध्ये अडचणी असल्याच्या ग्राहकांच्या सातत्याच्या तक्रारी असताना आता इंटरनेट सुविधाही वारंवार कोलमडत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहे. आज (शनिवारी) सकाळी ७ वाजेपासून अंबड औद्यागिक वसाहतीतील बीएसएनएलची ब्रॉड बॅण्ड सुविधा कोलमडली. सदरची सुविधा सुरळीत करण्यासाठी रात्रीच्या आठ वाजले. शनिवार असल्याने औद्योगिक वसाहतीतील बऱ्याचशा कंपन्या बंद असल्या तरी अनेक कंपन्यांचे कार्यालयीन व डाटासंदर्भातील कामे सुरूच असतात. मात्र, बीएसएनएलची ब्रॉड बॅण्ड सुविधाच सकाळपासून तांत्रिक कारणामुळे बंद पडली. यासंदर्भात अनेक ग्राहकांनी बीएसएनएलच्या संबंधित विभागाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता समाधानकारण उत्तरे मिळत नव्हती. तसेच सदरची सेवा सुरळीत होण्यासाठी किती कालावधी लागेल याबाबतही माहिती दिली जात नव्हती. त्यामुळे परिसरातील बॅँकांची कार्यालयांसह अनेक कंपन्यांची आॅनलाईन सुरू असलेली कामे खोळंबली. रात्री आठच्या सुमारास सदरची सेवा सुरू झाली असली तरी मात्र अखेरपर्यंत सदरची सेवा खंडित होण्यामागचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. (प्रतिनिधी)उपसरपंचपदी सोनवणे मालेगाव : तालुक्यातील टोकडे गावाच्या उपसरपंचपदी शंकर सोनवणे यांची आवर्तन पद्धतीने बिनविरोध निवड करण्यात आली. अध्यक्षस्थानी सरपंच कमळाबाई रंधवा होत्या. मावळते उपसरपंच धोंडू कव्हाड यांनी राजीनामा दिल्यानंतर सदर निवडणूक घेण्यात आली. ग्रामसेवक भाऊसाहेब मगरे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. (प्रतिनिधी)