शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

बीएसएनएल कर्मचाºयांनी रोखले : संपामुळे ग्राहक सेवा केंद्रापासून सर्व कामे ठप्प महाप्रबंधकांना ‘कार्यालयबंदी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 01:14 IST

प्रलंबित वेतन करार लागू करण्याच्या मागणीकडे केंद्र सरकारकडून दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ बीएसएनएलचे कर्मचारी मंगळवारपासून दोन दिवसांच्या लाक्षणिक संपावर गेले असून, त्यामुळे नियमित सेवा वगळता ग्राहक केंद्रासह सर्व सेवा ठप्प झाल्या.

ठळक मुद्देसंपात अधिकारी, कर्मचारी, अभियंता सहभागी वेतनवाढीचा संबंध कंपनीच्या नफ्याशी

नाशिक : प्रलंबित वेतन करार लागू करण्याच्या मागणीकडे केंद्र सरकारकडून दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ बीएसएनएलचे कर्मचारी मंगळवारपासून दोन दिवसांच्या लाक्षणिक संपावर गेले असून, त्यामुळे नियमित सेवा वगळता ग्राहक केंद्रासह सर्व सेवा ठप्प झाल्या. विशेष म्हणजे निगमचे महाप्रबंधक नितीन महाजन यांना संचार भवनातील मुख्य कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच कर्मचाºयांनी रोखून जवळपास घेरावच घातल्याने त्यांना कार्यालयात न जाताच माघारी फिरावे लागले.या संपात जिल्ह्यातील अकराशे अधिकारी, कर्मचारी, अभियंता सहभागी झाले आहेत. बीएसएनएल कर्मचाºयांच्या वेतन करारास व्यवस्थापन समिती आणि बोर्डाने मान्यता दिली असून, हा प्रस्ताव डीओटीकडे पाठविण्यात आला आहे. तथापि, वेतनवाढीचा संबंध कंपनीच्या नफ्याशी जोडला जात असून, हा प्रकार अन्यायकारक असल्याचे युनियन व असोसिएशनचे म्हणणे आहे. बीएसएनएल ही सामाजिक उद्दिष्टासाठी सरकारने स्थापन केलेली कंपनी असून, कोट्यवधी रुपयांचा तोटा सहन करूनही दुर्गम भागात सेवा देत आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे कंपनीचा विकास होऊ शकलेला नाही. सरकारने कंपनीच्या सर्व आर्थिक सवलती काढून घेतल्या तसेच गुंतवणुकीसाठी भांडवल नाही. नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार नाही त्यातच कंपनीचा हजारो कोटी रुपयांचा निधी सरकारने शून्यावर आणला असून, खासगी कंपन्यांशी स्पर्धा करणे कठीण झाले. तरीही कर्मचाºयांनी खासगी स्पर्धेच्या तोडीस तोड सेवा दिल्याने कंपनी आॅपरेशनल प्रॉफीटमध्ये आली आहे, असे असतानाही डीओटी आणि डीपीई वेळकाढूपणा करून कर्मचाºयांना वेतनवाढ देण्यास टाळाटाळ करीत असल्याचा कर्मचारी संघटनांचा आरोप असून, त्या पार्श्वभूमीवर संप करण्यात आला आहे. मंगळवारी निगमच्या मुख्यालयासमोर संपकरी अधिकारी आणि कर्मचाºयांनी निदर्शने केली. त्यात एम. बी. सांगळे, एस. ए. भदाणे, राजेंद्र लहाणे, डी. एम. गोडसे, तिवडे, एल. एम. शिंदे, बाविस्कर सहभागी झाले होते.