शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

पशुधन वाचविण्यासाठी ‘ब्रुसेला’ लसीकरण मोहीम

By admin | Updated: October 9, 2014 01:12 IST

पशुधन वाचविण्यासाठी ‘ब्रुसेला’ लसीकरण मोहीम

नाशिक : जिल्ह्यात अत्यंत घातक व दुर्मीळ असा ब्रुसेला हा आजार गाय आणि म्हैस या पशुधनाला जडण्याचा धोका असून, त्याचे उच्चाटन करण्यासाठी चार ते बारा महिन्यांच्या आतील गाय व म्हशीच्या वासरू व पारडू यांना ब्रुसेला लसीकरण करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. पुंडलिकराव बागुल यांनी दिली.गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्णात हा ब्रुसेला आजाराची लागण दिसून आल्याने त्यावर तातडीचे उपचार म्हणून ही लसीकरण मोहीम हाती घेण्यात आल्याचे डॉ. पुंडलिकराव बागुल यांनी सांगितले आहे. ब्रुसेला या आजारात गाय किंवा म्हशीला गर्भधारणा होत नाही. तसेच अशा गायी किंवा म्हशीच्या संपर्कात एखादा पशुधन विकास अधिकारी आलाच आणि त्याने निर्जंतुकीकरणाशिवाय काळजी न घेता घरात वावर केल्यास प्रत्यक्षात मनुष्यालाही हा आजार बळावण्याची शक्यता आहे. म्हणूनच जिल्ह्णातील गाय व म्हशीच्या चार ते बारा महिन्यांच्या आतील वासरू व पारडू यांना ही ब्रुसेला लस टोचण्यात येणार असून, येत्या २० आॅक्टोबरपर्यंत ही ब्रुसेला लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनीही या लसीकरणात सहभागी होऊन आपल्या पशुधनाची काळजी घ्यावी, असे आवाहन डॉ. पुंडलिकराव बागुल यांनी केले आहे. (प्रतिनिधी)