शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
3
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
4
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
5
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
6
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
7
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
8
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
9
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
10
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
11
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
12
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
13
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
14
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
15
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
16
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
17
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
18
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
19
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
20
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली

पोटच्या गोळ्यानेच केला जन्मदात्यांसह भावाचा खून!

By admin | Updated: June 8, 2017 00:25 IST

तिहेरी खून प्रकरण : भांडणास त्रासून केली हत्या

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : लहानपणापासूनच धाकट्या भावाच्या चुका आई-वडील पोटात घालतात मात्र, आपणास शिव्यांचेच धनी व्हावे लागते, सापत्नपणाची वागणूक तर नेहमीचीच़ त्यातच धाकट्या भावाच्या अनैतिक संबंधांमुळे घरात सुरू असलेल्या वादामुळे थोरला मुलगा सोमनाथ जगन्नाथ शेळके यानेच जन्मदाते आई-वडील व भावाचा खून केल्याची माहिती ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकुश शिंदे यांनी बुधवारी दिली़ ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेस या खुनाचा उलगडा करण्यास यश आले आहे़दिंडोरी तालुक्यातील कोकणगाव खुर्द येथे ३० मे रोजी जगन्नाथ शेळके, शोभा जगन्नाथ शेळके आणि हर्षद जगन्नाथ शेळके या तिघांचा खून करण्यात आल्याची घटना घडली होती़ मृतदेहांवरील दागिने तसेच घरातील वस्तूही जागेवरच आढळून आल्याने खुनाचे नेमके कारण काय याबाबत पोलीस यंत्रणाही चक्रावली होती़ सोमनाथ शेळके याच्या फिर्यादीवरून वणी पोलीसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर नवले यांनी तीन पथके तयार केली होती़ कुटुंबातील तिघांच्या मृत्यूनंतरही चेहऱ्यावर कोणतेही हावभाव नसलेला फिर्यादी सोमनाथवर पोलिसांनी पाळत ठेवली असता त्याचे वागणे संशयास्पद आढळून आले़ यानंतर पोलिसी खाक्या न दाखविता भावनिक साद घातल्यानंतर त्याने आई, वडील व भाऊ या तिघांचा ट्रॅक्टरच्या टॉपलिंगने खून केल्याची कबुली दिली.घरातील थोरला मुलगा असून, तसेच शेतीची सर्व कामे करूनही शिव्याच खाव्या लागत असे़ मात्र लहान भाऊ हर्षद हा काहीही कामधंदा करीत नसूनही आई-वडील त्याच्या चुकांकडे काणाडोळा करीत असल्याचा राग सोमनाथच्या मनात होता़ मे महिन्याच्या अखेरीस धाकटा भाऊ हर्षदचे अनैतिक संबंध उघडकीस आले व त्यावरून घरात वाद सुरू झाले़ यानंतर आई-वडील, तुही धाकट्यासारखाच आहेस, दारू पितो, तुझेही अनैतिक संबंध असतील, असे सारखे टोचून बोलत असत़ याच कारणावरून ३० मे रोजी सकाळी सोमनाथला वडिलांनी शिवीगाळ केली होती़ त्यामुळे रागाच्या भरात सोमनाथने या तिघांच्या डोक्यात वार करून त्यांचा खून केला.स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील, उपनिरीक्षक मच्छिंद्र रणमाळे, सहायक पोलीस उपनिरीक्षक अनिल धुमसे, अरुण पगारे, रामहरी मुंढे, हवालदार रवींद्र वानखेडे, कैलास देशमुख, अमोल घुगे आदिंनी यशस्वीरीत्या या खुनाचा उलगडा केला़सोमनाथचा स्वभाव रागीट२०१३ मध्ये शेतातील आंब्याच्या झाडाच्या फांद्या छाटण्यावरून वडील सोमनाथला रागावले होते़ तेव्हा त्याने कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता़ त्यास छोट्या-छोट्या कारणांवरून राग येत असल्याचे पोलिसांनी सांगितले़पोलीस यंत्रणाही चक्रावलीएकाच कुटुंबातील तिघांच्या खुनामागे चोरी वा स्थावर मालमत्ता असे कोणतेही कारण समोर येत नसल्याने पोलीस यंत्रणाही चक्रावली होती़ त्यामुळे त्यांनी मयत हर्षदचे अनैतिक संबंध असलेल्या मुलीच्या कुटुंबीयांकडेही चौकशी केली, मात्र हाती काही लागले नाही़ त्यात फिर्यादी सोमनाथकडे खून करण्यासारखे ठोस कारण नसल्याने पोलिसांना त्याबाबत प्रथम शंका आली नाही़ मात्र, त्याच्यावर पाळत ठेवल्यानंतर त्याच्या संशयास्पद हालचालींमुळे त्याची चौकशी केली व अखेर सत्य बाहेर आले़