शहरं
Join us  
Trending Stories
1
Crime: वैजापुरात महिला कीर्तनकाराची आश्रमातच दगडाने ठेचून हत्या, छ. संभाजीनगरात खळबळ!
2
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
3
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
4
Bigg Boss मधील आतापर्यंत तिसऱ्या स्पर्धकाचा अचानक मृत्यू; प्रत्येक घटनेमागे कारण एकच...
5
मुले पुढे जातात, मुलींना लग्न करणेही होते कठीण; लिव्ह-इन रिलेशनशिपबद्दल न्यायालयाकडून गंभीर चिंता
6
"मी हात जोडले, पाय धरले, पण त्या नराधमाने…’’, कोलकाता बलात्कार प्रकरणातील पीडितेचा धक्कादायक जबाब   
7
कोण आहे शेफालीचा पती? ५ वर्षांतच मोडलेला पहिला संसार, मग पराग त्यागीच्या प्रेमात पडली अन्...
8
"मला फक्त ५ मिनिटे आधी कळालं..."; अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंसच्या पत्नी उषा यांचा खुलासा
9
मुंबई: अस्मी चव्हाणने ३० व्या मजल्यावरून उडी मारून का केली आत्महत्या? पोलिसांच्या तपासातून समोर आली माहिती
10
बांगलादेशींना नोकरी देणाऱ्यांवर होणार कारवाई; राज्य सरकारच्या आदेशात काय?
11
"तरुण दिसण्यासाठी ती गेली ५ वर्ष.."; शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर डॉक्टरांनी केला मोठा खुलासा
12
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
13
खराब हवामानामुळे पिकाचे होणारे नुकसान टाळता येणार, नव्या टेक्नोलॉजीचा शेतकऱ्यांना फायदाच!
14
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
15
Shefali Jariwala Death: "बिग बॉस शापित आहे", शेफाली जरीवालाच्या निधनानंतर अभिनेत्रीची पोस्ट
16
Philippines Earthquake: फिलीपिन्समध्ये ६.० तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
17
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
18
११वी प्रवेशाचा घोळ थांबेना, विद्यार्थ्यांची चिंता मिटेना; तांत्रिक अडचणींचे ग्रहण सुटणार कधी?
19
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
20
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?

विद्युत वाहिन्यांना फांद्यांचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 00:06 IST

विद्युत वाहिन्यांजवळून गेलेल्या झाडांच्या फांद्या छाटण्यासाठी पावसाळ्यापूर्वी मेंटेनन्सची कामे दरवर्षी महावितरणाला करावी लागतात. त्यासाठी काही तासांसाठी विद्युत पुरवठादेखील खंडित केला जातो.

नाशिक : विद्युत वाहिन्यांजवळून गेलेल्या झाडांच्या फांद्या छाटण्यासाठी पावसाळ्यापूर्वी मेंटेनन्सची कामे दरवर्षी महावितरणाला करावी लागतात. त्यासाठी काही तासांसाठी विद्युत पुरवठादेखील खंडित केला जातो. पावसाळ्यात फांद्यांमुळे विद्युत वाहिन्या तुटून वीजपुरवठा खंडित होऊ नये हा त्यामागचा मूळ हेतू. मात्र प्रत्यक्षात पावसाळा सुरू होईपर्यंत महावितरणला अशा फांद्यांच्या विळख्यातील वाहिन्या मुक्त करता आलेल्या नाहीत. शहरातील अनेक भागात अजूनही झाडांजवळून वाहिन्या गेल्याचे स्पष्टपणे दिसते. काही ठिकाणी तर फांद्यांच्या मधून वाहिन्या गेल्या आहेत. यामुळे महावितरणकडून पावसाळापूर्वी मेंटेनन्सची कामे कशी केली जातात हेच उघड झाले आहे. मेंटेनन्सच्या नावाखाली महावितरणकडून पावसाळा सुरू होण्यापूर्वी वाहिन्या दुरुस्तीची कामे हाती घेतली जातात. यासाठी संबंधित विभागाचा वीजपुरवठा चार तासांपेक्षा अधिक काळासाठी बंद केला जातो. पावसाळ्यापूर्वी अशाप्रकारची कामे झाली तरीही पावसाळ्यात मात्र वीज गायब होण्याचे आणि वाहिन्यांवर फांद्या पडून वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार सुरूच असतात. विशेष म्हणजे पावसाळ्यापूर्वी सुरू झालेली महावितरणची ही दुरुस्ती मोहीम प्रत्यक्ष पावसाळा सुरू होईपर्यंत कायम असते. शहरात मागील महिन्यापासून अनेकदा दुरुस्तीच्या नावाखाली वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. या महिन्यातही फांद्या छाटण्यासाठी वीजप्रवाह बंद करण्यात आल्याची कारणे सांगितली गेली. प्रत्यक्षात अशी कामे जर पावसाळ्यापूर्वी करावी लागत असताना प्रत्यक्षात पावसाळ्यातही वीजपुरवठा का खंडित केला जातो, असा संतप्त सवाल वीजग्राहकांचा आहे.  नाशिक शहर - १ आणि २ मधील पावसाळापूर्व मेंटेनन्सची कामे पूर्ण झाल्याचा दावा महावितरणकडून केला जात आहे. शहर - १ मध्ये काही ठिकाणी महापालिकेच्या परवानगीमुळे कामे प्रतिक्षेत असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :electricityवीज