शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
2
देवदर्शनासाठी जाणारी पिकअप १०० ते १५० फूट दरीत; ३० महिला जखमी, तिघांचा मृत्यू, खेड तालुक्यातील घटना
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात, जीप आणि दुचाकीच्या धडकेत 5 जणांचा जागीच मृत्यू; नेमकं काय घडलं?
4
हत्तीजवळ जाऊन फोटो काढणे भोवले; तरुणाला पायाखाली चिरडले, पाहा धक्कादायक Video...
5
ITR ची डेडलाईन ४५ दिवसांनी का वाढवली? १२ लाखांपर्यंतचा 'नो टॅक्स' आता नाही, पुढच्या वर्षी
6
आयकर कायद्याचा चेहरामोहरा बदलणार? अर्थमंत्र्यांनी सादर केले नवे विधेयक, 'हे' मोठे बदल तुमच्यासाठी महत्त्वाचे!
7
राहुल गांधी, संजय राऊतांसह अनेक खासदार पोलिसांच्या ताब्यात; 'मतचोरी'वरून विरोधकांचा निवडणूक आयोगावर मोर्चा
8
ICC Womens World Cup 2025 : युवराज सिंगच्या साक्षीनं हरमनप्रीत कौरनं दिला शब्द; आम्ही...
9
१५० सेवा, ३ कोटी प्रवासी, ७५ हजार कोटींचे उत्पन्न; ‘वंदे भारत’ची महाराष्ट्रात काय स्थिती?
10
‘काँग्रेसमुक्त भारत करण्याच्या नादात भाजपाच काँग्रेसयुक्त झाला; भाजपाकडे नेतृत्व, कार्यकर्त्यांचा अभाव,’’ हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला   
11
AUS vs SA: एकेकाळी 'मुंबई इंडियन्स'कडून खेळणाऱ्या फलंदाजांने मोडला सूर्यकुमार यादवचा विश्वविक्रम
12
“सगळीकडे हीच चर्चा, मतचोरीविरोधात जनता राहुल गांधींसोबत, संपूर्ण देश म्हणणे ऐकतोय”: काँग्रेस
13
आई दुसऱ्यांकडे काम करायची, वडील विटा उचलायचे; २२ व्या वर्षी लेक देशातील सर्वात तरुण IPS
14
VIDEO: महुआ मोईत्रा बेशुद्ध झाल्या, राहुल गांधींनी पाणी दिले; टीएमसीची आणखी महिला खासदार...
15
Viral Video: मध्यरात्री शौचालयासाठी बाहेर पडला, अचानक समोर दिसला बिबट्या, पहारेकरीसोबत असं घडलं की...
16
‘माझी पत्नी बाहेरच्या लोकांना घरी बोलावते’, व्हिडीओमध्ये सांगून पतीनं उचललं भयानक पाऊल...  
17
बर्फाळ टेकडीवर वसलाय 'हा' छोटासा देश! स्वतःचा झेंडा, ध्वज आणि पासपोर्टची सुविधा देखील उपलब्ध; तुम्हाला माहितीये का?
18
१२ लाखांपर्यंतची करसवलत रद्द होणार का? नव्या आयकर विधेयकावरुन सरकारने केला खुलासा
19
Gold Silver Price 11 August: सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, १० ग्रॅम GOLD साठी किती खर्च करावा लागणार?
20
"जोपर्यंत लोकांच्या मनात निवणुकीच्या निष्पक्षतेबाबत संशय राहील तोपर्यंत...’’, शशी थरूर यांचं विधान  

कारची काच फोडून लाखाची रोकड पळविली

By admin | Updated: March 23, 2017 01:26 IST

नाशिक : बँकेतून पैसे काढून परतलेल्या कारचालकाचे लक्ष विचलित करून पल्सर दुचाकीवरील दोघा संशयितांनी कारची काच फोडून एक लाख रुपये ठेवलेली बॅग पळवून नेल्याची घटना बुधवारी (दि़२२) दुपारच्या सुमारास घडली़

नाशिक : बँकेतून पैसे काढून परतलेल्या कारचालकाचे लक्ष विचलित करून पल्सर दुचाकीवरील दोघा संशयितांनी कारची काच फोडून एक लाख रुपये ठेवलेली बॅग पळवून नेल्याची घटना बुधवारी (दि़२२) दुपारच्या सुमारास टिळकरोडवरील बँक आॅफ महाराष्ट्रसमोर घडली़ या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते़सरकारवाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रामदास रहाडे यांनी दुपारच्या सुमारास त्र्यंबकरोडवरील एका बँकेतून एक लाख रुपयांची रोकड काढली़ यानंतर रहाडे व त्यांच्यासोबत असलेल्या महिला हे झेन कारने (एमएच १५ बीडी ३९३४) टिळकवाडीत आले़ दुपारी अडीच वाजेच्या सुमारास कारमधील महिला या ज्यूस पिण्यासाठी गेल्या़ तर त्र्यंबकरोडपासून त्यांच्या मागावर असलेल्या दुचाकीवरील दोघा संशयितांनी महिलांनी तुम्हाला बोलावल्याचा निरोप दिला़ रहाडे या कारमधून उतरून दुकानाकडे गेल्या असता काळ्या रंगाच्या पल्सर दुचाकीवर असलेल्या दोघा संशयितांपैकी पाठीमागे बसलेल्या संशयिताने त्याच्याजवळील बॅगने कारच्या डाव्या बाजूची काच फोडली़ यामुळे मोठा आवाजही झाला, मात्र आवाज नेमका कुठून आला याचा अंदाज नागरिकांना आला नाही़ ही संधी साधून या संशयितांनी कारमधील एक लाख रुपये व कागदपत्रे असलेली बॅग उचलून रामायण बंगल्यापासून शरणपूररोडच्या दिशेने पळ काढला़  रहाडे यांना दुचाकीवरील दोघांचा संशय आल्याने तसेच त्यांनी त्यांच्याकडील बॅग पाहताच आरडाओरड केली़ तर काही तरुणांनी दुचाकीस्वारांचा पाठलाग करण्याचाही प्रयत्न केला मात्र ते फरार झाले़ या संशयितांचा पाठलाग करणाऱ्यांनी चोरट्यांची काळी पल्सर दुचाकी असून तिचा नंबर एमएच १६, ६५५४ असल्याचे पोलिसांना सांगितले़ दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक पोलीस आयुक्त डॉ. राजू भुजबळ, सरकारवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे हे घटनास्थळी दाखल झाले़ त्यांनी शहरात नाकाबंदी करण्याच्या सूचनाही दिल्या़; मात्र चोरट्यांना पकडण्यात यश आले  नाही़ (प्रतिनिधी)