शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
2
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
3
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
4
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
5
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
6
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
7
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
8
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
9
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
10
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
11
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
12
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
13
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
14
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
15
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
16
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
17
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
18
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
19
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
20
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...

जिल्ह्यातील ब्रिटिशकालीन पूल होणार इतिहासजमा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 21:27 IST

नाशिक जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असलेल्या नऊ मोठ्या ब्रिटिशकालीन पुलांवरील वाहतूक सुरुळीत असली तरी भविष्यात हे पूल इतिहास जमा होणार आहेत.

ठळक मुद्दे नाशिक जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असलेल्या नऊ मोठ्या ब्रिटिशकालीन पुलांवरील वाहतूक सुरुळीत भविष्यात या पुलांना समांतर पूल बांधावे लागण्याचा अभिप्राय नोंदविण्यात आलेला आहे३० मीटरपेक्षा अधिक लांबीच्या जवळपास शंभर पुलांचीदेखील पावसाळ्यापूर्वीच तपासणी शंभर पूल हे सुस्थितीत असून, ६८ पुलांमध्ये किरकोळ आणि मोठी दुरुस्ती सुचविण्यात आलेली

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असलेल्या नऊ मोठ्या ब्रिटिशकालीन पुलांवरील वाहतूक सुरुळीत असली तरी भविष्यात हे पूल इतिहास जमा होणार आहेत. पुलांच्या मागीलवर्षीच्या पाहणी अहवालावरून हे पूल सुस्थितीत असले तरी भविष्यात या पुलांना समांतर पूल बांधावे लागण्याचा अभिप्राय नोंदविण्यात आलेला आहे.नाशिकच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित जिल्ह्यातील नऊ मोठ्या पुलांचा समावेश आहे. गिरणा, खडकी, वाघाडी, लक्ष्मी, अगस्ती, दारणा, स्थानिक नाला आणि पार नदीवर असलेल्या ब्रिटिशकालीन पुलांची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागावर आहे. या पुलांची पावसाळ्यापूर्वी तपासणी करण्यात आली असून, यातील पाच पूल हे सुस्थितीत असल्याची नोंद करण्यात आली आहे, तर तीन पुलांना समांतर पूल बांधण्यात आलेले आहेत. एक पुलाची दुरुस्ती सुचविण्यात आली असून, पूल पाडण्याची गरज नसल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे.सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे या ब्रिटिशकालीन पुलांची किरकोळ दुरुस्ती करण्यात आली असली तरी पुल जुना झाल्याने भविष्यात पुलांची पुनर्बांधणी आवश्यक असल्याचा शेरा मारण्यात आला आहे. विशेष म्हणजे हे सर्व पूल शंभर वर्षांपेक्षा जास्त आर्युमानाचे झाल्याने या पुलांना समांतर पूल निर्माण होऊन ब्रिटिशकालीन पुलांवरील वाहतूक कमी केली जाणार आहे. दोन ठिकाणी नवीन पूल निर्माणही झाले असून, एका पुलाला समांतर पुलाचे काम प्रगतिपथावर आहे.

दरम्यान, महापालिका हद्दीतील तसेच  महामार्गावरील ब्रिटिशकालीन पुलांची माहिती संबंधित विभागाकडे असून, या पुलांच्या दुरुस्तीसाठीचे नियोजन सार्वजनिक बांधकाम विभागालाच करावे लागते. राज्य मार्गावरील ३० मीटरपेक्षा अधिक लांबीच्या जवळपास शंभर पुलांचीदेखील पावसाळ्यापूर्वीच तपासणी करण्यात आली असून, त्याबाबतचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. त्यानुसार शंभर पूल हे सुस्थितीत असून, ६८ पुलांमध्ये किरकोळ आणि मोठी दुरुस्ती सुचविण्यात आलेली आहे.