शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

गोणीतून कांदा विक्रीस आणावा

By admin | Updated: July 25, 2016 23:53 IST

मनमाड : बाजार समिती संचालकांच्या बैठकीत आवाहन

 मनमाड : यापूर्वी शेतकऱ्यांकडून वसूल केली जाणारी अडत आता व्यापाऱ्यांकडून वसूल करण्याच्या निर्णयाविरोधात व्यापारीवर्गाने सुरू केलेला संप मागे घेतला असल्याने शेतकऱ्यांनी जिल्ह्यातील इतर बाजार समित्यांप्रमाणे मनमाड येथेही गोणीतून कांदा विक्रीसाठी आणावा, असे आवाहन बाजार समिती संचालकांच्या बैठकीत करण्यात आले. सभापती डॉ. संजय सांगळे बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते.बाजार समित्यांनी महाराष्ट्र शासनाच्या दि. ५ जुलै २०१६ रोजी काढण्यात आलेल्या अध्यादेशाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शेतकऱ्यांकडून वसूल केली जाणारी अडत व्यापाऱ्यांकडून वसूल करण्याचे ठरले होते.सर्वत्र व्यापाऱ्यांकडून अडत वसूल करण्याच्या निर्णयाविरोधात व्यापाऱ्यांनी संपाचे हत्त्यार उपसले होते. चिघळलेल्या या संपावर तोडगा काढण्यासाठी व्यापारी संघाचे जिल्हाध्यक्ष सोहनलाल भंडारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील सर्व व्यापाऱ्यांच्या बैठकीत शेतकऱ्यांकडून अडत वसूल करू नये तसेच संप मागे घेऊन लिलाव पूर्ववत सुरू करावे, असा एकमुखी निर्णय घेण्यात आला. या पार्श्वभूमीवर मनमाड बाजार समितीमध्ये संचालक व व्यापाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. शेतकऱ्यांनी आपला कांदा प्रतवारी करून ४५ किलोच्या गोणीतून विक्रीसाठी आणावा, असे आवाहन बाजार समितीच्या वतीने करण्यात आले. यावेळी माजी आमदार संजय पवार, उपसभापती अशोक पवार, संचालक किशोर लहाने, राजू सांगळे यांच्यासह संचालक व व्यापारी उपस्थित होते. (वार्ताहर)