शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णापर्यंत आरोग्यसेवा पोहोचवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 00:48 IST

नाशिक : आशा स्वयंसेविका प्रत्येक घराघरात पोहोचलेल्या आहेत. लोकप्रतिनिधी आणि अधिकारी केवळ आदेश देतात. रुग्णापर्यंत पोहचून त्यांना आरोग्यसेवा देण्याचे काम आशा कर्मचारी करतात. आशा करत असलेले हे काम चांगले असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांनी केले.

नाशिक : आशा स्वयंसेविका प्रत्येक घराघरात पोहोचलेल्या आहेत. लोकप्रतिनिधी आणि अधिकारी केवळ आदेश देतात. रुग्णापर्यंत पोहचून त्यांना आरोग्यसेवा देण्याचे काम आशा कर्मचारी करतात. आशा करत असलेले हे काम चांगले असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांनी केले.  जि.प.च्या आरोग्य विभागातर्फेआयोजीत डॉ. आनंदीबाई जोशी पुरस्काराचे वितरण बुधवारी (दि.२७) झाले. त्यावेळी शीतल सांगळे बोलत होत्या. अध्यक्षस्थानी आरोग्य सभापती यतिंद्र पगार होते. यावेळी बांधकाम सभापती मनीषा पवार, समाजकल्याण सभापती सुनीता चारोस्कर, जि.प. सदस्य डॉ. सयाजी गायकवाड, यशवंत ढिकले, सारिका नेहरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुशील वाघचौरे, शोभा खैरनार, डॉ. दावल साळवे उपस्थित होते. आरोग्य विभागात आशा कर्मचारी अष्टपैलूने काम करतात, ते चांगले आहे. मात्र, आरोग्य केंद्रातील स्वच्छतेला प्राधान्य देण्याचे आवाहन सभापती पगार यांनी यावेळी केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते जिल्हास्तरीय स्वयंसेविका, तालुकास्तरीय आशा स्वयंसेविका, प्राथमिक आरोग्य केंद्र, नावीन्यपूर्ण जिल्हास्तरीय, डॉ. आनंदीबाई जोशी प्रा. आरोग्य केंद्र, उपकेंद्र पुरस्कार व उत्कृष्ट ग्रामीण रुग्णालय पुरस्काराचे वितरण झाले. डॉ. वाघचौरे यांनी प्रास्ताविक केले.ही आहेत पुरस्कारार्थींची नावेच्ग्रामीण रुग्णालय पुरस्कार : नांदगाव ग्रामीण रुग्णालय. - डॉ. आनंदीबाई जोशी प्रा. आरोग्य केंद्र : करंजगव्हाण (प्रथम), काळुस्ते (व्दितीय) लोहनेर (तृतीय).डॉ. आनंदीबाई जोशी उपकेंद्र : बोरटेंभे (प्रथम), गुंजाळनगर (द्वितीय), पिंपळद (तृतीय).जिल्हास्तरीय स्वयंसेविका : वैशाली सोनवणे (वडनेर खाकुर्र्डी, मालेगाव), नासिम यज्जाद शेख (माणी, सुरगाणा).चतालुकास्तरीय आशा स्वयंसेविका : सुरेखा खैरनार (अंबासन), शैला नेरकर (केळझर), विनता खैरनार (खर्डा), रोशनी शिरसाठ (मेशी), रंजना गांगोडे व कविता रायकर (तळेगाव दि.), छाया सोनजे (उसवड), संगीता आहेर (वडनेरभैरव), कल्पना नाठे (काननवाडी), जयश्री गोडसे (वाडीवºहे), अनित निकम (ओतूर), सुनीता शिंदे (नवी बेज), सुनीता गरूड (वजनेर खाकुर्र्डी), वंदना सोनवणे (रावळगाव), सुरेखा जगताप (बोलठाण), सुंदराबाई कुमावत (वेहेळगाव), सुषमा सदावर्ते (चांदोरी), कविता टोंगारे (पिंपळगाव बसवंत), बेवी वाघ व विमल दिवे (धोंडेगाव), सीता जाधव (कोहेर), अनिता गायकवाड (आंबे), लता तुपे व नलिनी सानप (नायगाव), सुवर्णा सकाळे व राधा बदादे (अंबोली), भीमा खांडवी व वत्सला महाले (माणी), सिंधू थोरात (अंदरसूल), कविता वाघ (मुखेड).च्प्रा. आरोग्य केंद्र पुरस्कार : कविता राजगुरू (मुखेड), ज्योती सावंत (पाटोदा) व कविता पाटोळे (सावरगाव).च्नावीन्यपूर्ण जिल्हास्तरीय पुरस्कार : सुनीता बच्छाव (तळेगाव दि.) व योगिता चव्हाण (काजीसांगवी)च्आशा गट प्रवर्तक पुरस्कार : सुनंदा परदेशी (अंदरसूल), जोत्स्ना शेवाळे (काननवाडी), आशा शेळके (वावी).