पंचवटी : आडगाव येथील ब्रिटिशकालीन पुलाची दुरवस्था झाल्याने हा पूल धोकेदायक बनला आहे. पुलाची दुरवस्था होऊनही प्रशासन दखल घेत नसल्याने पुलाला दुरुस्तीची प्रतीक्षा करावी लागत आहे. हा पूल नाशिक मनपाच्या हद्दीत असला तरी त्याकडे महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम खाते यांचे दुर्लक्ष आहे. पुलाचे कथडे तुटलेले असल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. आडगावात बांधलेला पूल हा शंभर वर्षे जुना असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात येते. सदर पुलाचे कथडे दुरुस्त केल्यास अपघात टळतील. प्रशासनाने तत्काळ दखल घेऊन पुलाची दुरुस्ती करण्याची मागणी शिवसेनेचे सुनील जाधव, अनिल मते, किरण लभडे, गोकुळ मते, पप्पू पोटे, सुनील मते, युवराज माळोदे, प्रभाकर मते आदिंसह ग्रामस्थांनी केली आहे.
आडगाव येथील पुलाची दुरवस्था
By admin | Updated: July 17, 2014 21:58 IST