शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

एचआयव्ही तपासणीनंतरच वधू-वर चढणार बोहल्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 23:49 IST

निफाड/नायगाव : निफाड तालुक्यात एचआयव्ही तपासणीनंतरच वधू-वर बोहल्यावर चढण्याच्या निर्णयाला ११९ ग्रामपंचायतींनी ठरावाद्वारे हिरवा कंदील दिला आहे. महाराष्ट्रातील निफाड ...

ठळक मुद्देनिर्णय : निफाड तालुक्यातील ११९ ग्रामपंचायतींचा ठरावाला हिरवा कंदील

निफाड/नायगाव : निफाड तालुक्यात एचआयव्ही तपासणीनंतरच वधू-वर बोहल्यावर चढण्याच्या निर्णयाला ११९ ग्रामपंचायतींनी ठरावाद्वारे हिरवा कंदील दिला आहे.महाराष्ट्रातील निफाड उपजिल्हा रुग्णालयात येथील एकात्मिक समुपदेशन व चाचणी केंद्राची राज्यात पहिली अ‍ॅक्टिव्हिटी ठरली आहे. निफाड तालुक्यातील समुपदेशक नितीन परदेशी यांनी राबविलेल्या प्रयोगास तालुक्यातील ११९ ग्रामपंचायतींनी गावात लग्नाआधी युवक व युवतींनी एचआयव्ही तपासणी करूनच गावातील मुला-मुलींचे लग्न करण्याचा ठराव बहुमताने सहमत केला आहे. तसेच गाव व परिसरातील एचआयव्ही एड्सग्रस्त रुग्णांबाबत भेदभाव व कलंकित भावना न करण्याबाबतही ठराव मंजूर करण्यात आले. तालुक्यातील ११९ ग्रामपंचायतींपैकी ६७ भित्तिफलक रंगवून या दुर्धर आजाराविषयाची जनजागृती व आजाराविषयी घ्यावयाची काळजी तसेच औषधोपचार मिळण्याचे ठिकाण आदींबाबतची माहिती असलेले फलक ग्रामपंचायतींच्या सौजन्याने रंगविण्यात आले आहेत.निफाडचे गटविकास अधिकारी संदीप कराड व उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. सुनील राठोर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्टÑीय एड्स नियंत्रण कार्यक्रम राबविण्यात आला. ग्रामपंचायत स्तरापर्यंत जनजागृती व्हावी या उद्देशाने तालुक्यातील ग्रामपंचायतीत एचआयव्ही एड्स आजाराबाबत गैरसमज-भीती याबाबत शास्रीय व मूलभूत माहिती दिली. एचआयव्ही तपासणी कोठे केली जाते व प्रत्येक गर्भवती मातेने पहिल्या तीन महिन्यात आपली नाव नोंदणी व एचआयव्ही तपासणीबाबत जनजागृती करण्यात आली. मोहीम राबविण्यासाठी सहायक गटविकास अधिकारी आर.आर. सानप, जिल्हा शल्य चिकित्सक सुरेश जगदाळे, व्यवस्थापक योगेश परदेशी, के.टी. गाडद, एस.के. सोनवणे, पौर्णिमा कोंडके आदींचे सहकार्य लाभले.

आजच्या आधुनिक जमान्यातही अशा आजारांबाबत समाजात प्रखर जनजागृती करूनही रु ग्णांची हेळसांड होत आहे. त्यामुळे कलंक व भेदभाव समाज स्वीकृती, सामाजिक, नैतिक जबाबदारी व बांधिलकी याची उत्तम खूणगाठ बांधून ठेवण्याकरिता हा प्रयत्न होता. यापुढेदेखील असाच प्रयत्न राहणार आहे.- नितीन परदेशी, समुपदेशक, निफाड

टॅग्स :HIV-AIDSएड्सgram panchayatग्राम पंचायत