नाशिक : येथील तहसील कार्यालयामधील लाचखोर लिपिक जावेद नूरमहंमद शेख यास जिल्हा व सत्र न्यायालयाने दोन कलमान्वये शिक्षा सुनावली आहे. यामध्ये सहा महिने सक्तमजुरी व पाचशे रुपये दंड आणि एक वर्ष सक्तमजुरी व एक हजार रुपये दंड असे शिक्षेचे स्वरूप आहे. अंबड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू दाखल असलेल्या व्यक्तीचे नातेवाईक विम्याची रक्कम मंजुरीसाठी प्रमाणित प्रत घेण्याकरिता तहसील कार्यालयात गेले होते. कनिष्ठ लिपिक शेख याने तक्रारदाराकडून पाचशे रुपयांची लाच मागितली होती.
लाचखोर लिपिकास सक्तमजुरी
By admin | Updated: July 26, 2016 00:02 IST