शहरं
Join us  
Trending Stories
1
Video:"...आता मला काय विचारताय तुम्ही"; एकनाथ शिंदे चंद्रशेखर बावनकुळेंवर का संतापले?
2
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
3
कधीही फसणार नाही! ‘या’ स्ट्रॅटजीनं कराल म्युच्युअल फंडात गुंतवणूक; बनू शकेल मोठा पैसा, अनेकांना माहितच नाही
4
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
5
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
6
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
7
"आता सगळं ठीक झालंय...", परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'मध्ये कमबॅक; नक्की काय घडलं होतं?
8
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
9
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
10
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका
11
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
12
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
13
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
14
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
15
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
16
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
17
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
18
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
19
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
20
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग

लाच प्रकरण : संशयिताला पाठीशी घालण्याचा उद्योग

By admin | Updated: October 15, 2015 23:12 IST

मुख्यमंत्र्यांनी उपटले प्रशासनाचे कान!

नाशिक : जमीन प्रकरणात ३५ लाख रुपयांची लाच मागितल्याने गुन्हा दाखल होऊन पोलीस कोठडी भोगून आलेले मालेगावचे तत्कालीन अपर जिल्हाधिकारी रामचंद्र पवार यांच्यावर खात्यांतर्गत कारवाई करण्यास चालढकल करणाऱ्या जिल्हा प्रशासनाचे खुद्द मुख्यमंत्र्यांनाच कान उपटावे लागल्यानंतर खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने पवार यांच्याविरुद्ध पुरावे गोळा करण्यास सुरुवात केल्याचे स्पष्ट झाले आहे. रामचंद्र पवार यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार करणारे अ‍ॅड. शिवाजी सानप यांनी यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यासाठी त्यांना २१ आॅगस्ट रोजी पत्र पाठवून, पवार यांनी महाराष्ट्र नागरी सेवा नियमांचा भंग करण्याबरोबरच त्यांचे कृत्य हे गुन्हेगारी स्वरूपाचे व भारतीय दंड संहितेच्या कलम १७० खाली मोडत असल्याचे निदर्शनास आणून देत पवार यांच्याविरुद्ध फौजदारी स्वरूपाची कारवाई करावी, अशी मागणी केली होती. महसूल खाते अशा प्रकारची कारवाई करू शकत नसेल, तर शेतकऱ्यांना तशी तक्रार करण्याची अनुमती द्यावी, असा पर्यायही सुचविला होता. तथापि, पवार हे महसूल केडरचे असल्यामुळे त्यांच्या बचावासाठी महसूल यंत्रणेने वेळकाढूपणा अवलंबिला. या साऱ्या घटनेस अडीच महिन्यांचा कालावधी उलटूनही जिल्हा प्रशासन काहीच हालचाल करीत नसल्याचे पाहून त्या विरोधात थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करण्यात आली. १३ आॅक्टोबर रोजी मुख्यमंत्री कार्यालयाने जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून पवार प्रकरणात कायदेशीर कारवाई करण्याची सूचना दिल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना या साऱ्या प्रकरणाचे स्मरण होऊन त्यांनी तातडीने नांदगाव तहसीलदार व उपविभागीय अधिकाऱ्यांकडून पवार यांच्याविषयी माहिती मागविली. याचाच अर्थ पवार यांच्या विरुद्ध तक्रारदारांनी वेळोवेळी तक्रारी करूनही त्याकडे जिल्हा प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट झाल्याने पवार यांच्या बेकायदेशीर साऱ्या कृत्याला महसूल प्रशासनाचाच एकप्रकारे पाठिंबा होता असेच मानावे लागेल, अशी प्रतिक्रिया तक्रारदार अ‍ॅड. सानप यांनी व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)