शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
3
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
4
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
8
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
9
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
10
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
11
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
12
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
13
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
14
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
15
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
20
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले

लाचखोर अधिकारी सेवेत कायम

By admin | Updated: May 8, 2016 00:38 IST

मेहेरनजरचे गूढ : तक्रारदारांवर दबाव टाकण्यास सुरूवात

 नाशिक : तीन आठवड्यांपूर्वी वीस हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडल्यानंतर पोलीस कोठडीची हवा खाल्लेल्या मंडळ अधिकाऱ्यावर महसूल खात्याकडून कोणतीही कारवाई तर झालीच नाही, उलटपक्षी मंडळ अधिकाऱ्यावर मेहेरनजर दाखवीत त्याला सेवेत कायम ठेवले आहे. जामिनावर सुटलेल्या या अधिकाऱ्याने तक्रारदारावर दबाव टाकण्यास सुरुवात केल्याने प्रशासनानेच त्याला तशी मुभा दिल्याचा समज ग्रामस्थांमध्ये निर्माण झाला आहे. रवींद्र सोनवणे असे या मंडळ अधिकाऱ्याचे नाव असून, ग्रामस्थाचे जमिनीसंदर्भातील तक्रार रजिस्टरचे काम करून देण्याच्या मोबदल्यात २० हजार रुपयांची लाच घेताना १६ एप्रिल रोजी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने रंगेहाथ ताब्यात घेतले होते. दुसऱ्या दिवशी रविवारची सुटी असल्याने न्यायालयाने सोनवणे यास एक दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. तिसऱ्या दिवशी सोमवारी न्यायालयाने त्याची जामिनावर मुक्तता केली. सोनवणे यास लाच घेताना रंगेहाथ पकडल्याने दुसऱ्याच दिवशी जिल्हा प्रशासनाकडून त्यास सेवेतून निलंबित करण्याची कार्यवाही होणे अपेक्षित असताना, प्रत्यक्षात तसे काही घडले नाही. जामिनावर सुटलेल्या सोनवणे याने कामकाजात सक्रियता दर्शवित कार्यालयाचा ताबा घेतला. परिणामी त्याच्याविरुद्ध तक्रार केलेल्या तक्रारदारावर दबाव येण्यास सुरुवात झाली आहे. लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडूनही आपले काही होऊ शकत नाही, असा संदेशच त्यानिमित्ताने ग्रामस्थांमध्ये गेला आहे.