शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

कडाक्याच्या थंडीत आदिवासी गरिबांना ऊब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 17:18 IST

वेळुंजे (त्र्यंबक) : दातृत्वाच्या भावनेतून तालुक्यातील आश्रम शाळा पिप्री (त्र्यंबक) येथील असंख्य गरीब आदिवासी विद्यार्थ्यांना थंडीच्या कडाक्यात तुळजा भवानी ट्रस्ट नाशिकरोड या संस्थेच्या वतीने नव्या ऊबदार स्वेटर व कुंदेवाडी येथे महिलांना व जेष्ठांना ब्लँकेट वाटप करण्यात आले.

ठळक मुद्देपिप्री : तुळजा भवानी ट्रस्टने केले स्वेटर, ब्लँकेट वाटप

वेळुंजे (त्र्यंबक) : दातृत्वाच्या भावनेतून तालुक्यातील आश्रम शाळा पिप्री (त्र्यंबक) येथील असंख्य गरीब आदिवासी विद्यार्थ्यांना थंडीच्या कडाक्यात तुळजा भवानी ट्रस्ट नाशिकरोड या संस्थेच्या वतीने नव्या ऊबदार स्वेटर व कुंदेवाडी येथे महिलांना व जेष्ठांना ब्लँकेट वाटप करण्यात आले.ऐन थंडीच्या कडाक्यातच आदिवासी गोरगरिबांना ऊब मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. यावेळी संस्थेचे सचिव सुभाष पाटोळे, राजेंद्र गायकवाड, किशोर जाचक, बहिरू मुळाणे आदी उपस्थित होते.तुळजा भवानी ट्रस्टच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य देऊन आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक हातभार लावण्याचे काम चालू असतांना वाढत असलेल्या थंडीच्या कडाक्यामुळे गोरगरीब यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो व परिणामी त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असतो. या सर्व पार्श्वभूमीवर आरोग्याच्या दुष्टीने हिवाळ्यात आवश्यक असलेले आवश्यक ऊबदार स्वेटर व ब्लँकेट्स वाटप करण्यात आले.पिंप्री येथील आश्रम शाळेतील मुलांना स्वेटर व कुंदेवाडी येथील जेष्ठ नागरिक यांना ऊबदार ब्लकेट उपलब्ध करून देण्यात आले. संस्थेच्या या समाजसेवी कार्याचे परिसरातून विद्यार्थी- पालक- शिक्षक यांच्याबरोबरच सर्वसामान्य नागरिकांनी कौतुक केले आहे. यावेळी बहिरू मुळाणे, हरिभाऊ बोडके, आत्माराम महाले, सुभाष पाटोळे, राजेंद्र गायकवाड, रवींद्र गायकवाड, किशोर जाचक, रूंजा पाटोळे, बाळासाहेब चव्हाण, शिवाजी लवटे, पोपट पाटोळे, जाधव, अहिरे आदी उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थांसह विध्यार्थी मोठया प्रमाणात उपस्थित होते.(दोन फोटो ०९ पिंप्री,०९ पिंप्री १)